jammu kashmir security forces busted a terror module of lashkar e taiba in bandipora 7 terrorist arrested Danik Gomantak
देश

सुरक्षा दलाला मोठे यश, सात दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात

दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी सुरक्षा दलांसह बंदिपोरा जिल्ह्यात प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. बांदीपोरा येथे सुरक्षा दलांनी सात दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडून आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय चार दुचाकींसह सहा वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. (jammu kashmir security forces busted a terror module of lashkar e taiba in bandipora 7 terrorist arrested)

वृत्तानुसार, दहशतवाद्यांमध्ये एका दहशतवाद्याचाही समावेश आहे, ज्याने पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. याशिवाय चार दहशतवाद्यांचे सहकारीही यात सामील आहेत. पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या दहशतवाद्याचे नाव आरिफ एजाज सेहरी असे असून तो नदीहालचा रहिवासी आहे.

वैध व्हिसावर सेहरी 2018 मध्ये वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानला गेली होती. पण शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेऊन भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी केली आणि नंतर बांदीपोरामध्ये बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसोबत सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली. रामपोरा येथील रहिवासी एजाज अहमद रेशी आणि गुंडपोरा येथील रहिवासी शारिक अहमद लोन अशी या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.

दहशतवादी सुरक्षा दलांना लक्ष करत होते

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याशिवाय बांदीपोरासह सॉफ्ट टार्गेट्सना लक्ष करण्यास सांगितले होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका महिलेसह चार दहशतवाद्यांचे साथीदार आहेत. बांदीपोरा येथील रहिवासी रियाझ अहमद मीर उर्फ ​​मेथा सेहरी, तावहिदाबाद बाग येथील रहिवासी मोहम्मद वाजा उर्फ ​​गुल बाब, चिट्टीबंदी अरगा येथील रहिवासी मकसूद अहमद मलिक आणि शीमा शफी वाजा, अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT