Jammu & Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, जून महिन्यात आतापर्यंत 12 दहशतवादी ठार

Jammu and Kashmir News: काश्मीर पोलिस झोनचे एडीजीपी म्हणाले की, 'या कारवाईत एक स्थानिक दहशतवादी मारला गेला आणि त्याची ओळख अल बद्र दहशतवाद्याच्या धर्तीवर झाली आहे.'

Manish Jadhav

Jammu and Kashmir: दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हुवरा गावात झालेल्या चकमकीत एका स्थानिक दहशतवाद्याला ठार केल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी केला. काश्मीर पोलिस झोनचे एडीजीपी म्हणाले की, 'या कारवाईत एक स्थानिक दहशतवादी मारला गेला आणि त्याची ओळख अल बद्र दहशतवाद्याच्या धर्तीवर झाली आहे.' एडीजीपी पुढे म्हणाले की, 'त्याच्याकडून शस्त्रास्त्रांसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.'

गोळीबारात एक पोलीस जखमी

याआधी सुरुवातीच्या गोळीबारात एक पोलीस (Police) कर्मचारी जखमी झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जखमी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरु केली

वास्तविक, गावात दहशतवादी (Terrorist) असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरु केली होती. ऑपरेशनचे निरीक्षण करणार्‍या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित क्षेत्राची घेराबंदी होताच, लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरु केला. या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला.

जून महिन्यात आतापर्यंत 12 दहशतवादी मारले गेले

तसेच, या दहशतवाद्याच्या खात्म्यामुळे सुरक्षा दलांना आता जून महिन्यात 12 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे, त्याआधी कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी घुसखोरीचे 3 प्रयत्न हाणून पाडले असताना नियंत्रण रेषेवर 11 दहशतवादी मारले गेले होते.

दुसरीकडे, जमात-ए-इस्लामी (JeI), जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) आणि इतर सारख्या फुटीरतावादी संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या निधीच्या वाहिन्या खुंटल्या आहेत. थोडक्यात, प्रदेशात दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांविरोधात फास घट्ट करण्यात आला आहे.

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रहिवाशांना धमकावणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली आहे. बंदची अंमलबजावणी करणारे, रस्त्यावर निदर्शने करणारे आणि दगडफेक करणारे फुटीरतावादी एकतर तुरुंगात आहेत किंवा चिडीचुप आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

SCROLL FOR NEXT