Jammu Kashmir Floods Dainik Gomantak
देश

Jammu Kashmir Floods: पावसामुळे जम्मू-काश्मीर बेहाल; पहा Video

जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी हवाई दलाची (Indian Navy) मदत घेण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असुन अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीची आणखी एक घटना घडली आहे. यावेळी जम्मू-काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यात झालेल्या ढग फुटीची घटना घडली असुन या घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. (Kashmir Cloudburst: 7 killed in flash floods, check horrific videos)

किश्तवार जिल्ह्यातील होन्जार गावात ही घटना घडली असुन या घटनेत आठ ते दहा घरे ढिगाऱ्याखाली दबल्या गेली आहेत. जम्मू-काश्मीरचे उपपोलिस आयुक्तांनी सांगितले की घटनास्थळावरून चार मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्वीट करून म्हटले आहे की 30 ते 40 लोक बेपत्ता आहेत.

जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले कीबेपत्ता झालेल्या लोकांच्या 30 ते 40 शोधासाठी SDRF आणि सैन्य मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहे. हा भाग किश्तवारच्या उंचावर असुन, जिथे रस्त्याने जाणे सुद्धा शक्य होत नाही.

राष्ट्राध्यक्ष राम नाथ कोविंद यांनी किश्तवार जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली असुन, त्यांनी ट्विट केले की, “जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड मध्ये ढगफुटीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याने फार दु: खी झालो आहोत. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्य यशस्वी व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो आणि शोकग्रस्त कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त करतो. विशेष म्हणजे एक दिवस अगोदर राष्ट्रपती जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

SCROLL FOR NEXT