Jammu Kashmir: 3 terrorist killed in Sopore encounter in Baramulla district Dainik Gomantak
देश

24 तासांत जम्मू -काश्मीरात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान, लष्कराची मोठी कारवाई

सुरक्षा दलांनी आज बारामुल्ला (Sopore encounter) जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यापूर्वी सोमवारी जम्मू -काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमध्ये (Srinagar) दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

दैनिक गोमन्तक

जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलांना (Indian Army) मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी आज बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यापूर्वी सोमवारी जम्मू -काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमध्ये (Srinagar) दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.(Jammu Kashmir: 3 terrorist killed in Sopore encounter in Baramulla district)

बारामुल्लामध्ये झालेल्या या एन्काउंटर (Sopore encounter) बाबत एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री उशिरा सोपोरच्या पेठसीर येथील संपूर्ण परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली होती

ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे सुरक्षा दलांवर गोळीबार केला आणि चकमकीला सुरुवात झाली. सुरक्षा दलांसोबत झालेल्या या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे . अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांची ओळख पटवली जात असून त्यांच्या गटाचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये यावर्षी 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. कुमार यांनी ट्वीट केले की जम्मू -काश्मीर पोलीस, इतर सुरक्षा दल आणि काश्मीरच्या लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे 2021 मध्ये काश्मीर क्षेत्रात आतापर्यंत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

श्रीनगरमध्ये दोन जणांना कंठस्नान-

तर दुसरीकडे काळ जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तय्यबाशी संलग्न असलेल्या 'द रेसिस्टन्स फोर्स (टीआरएफ)' या दहशतवादी संघटनेच्या दोन टॉप कमांडरची हत्या केली होती . शहरातील अनेक लोकांना ठार मारण्यात आणि तरुणांना शस्त्रे उचलण्यासाठी दिशाभूल करण्यात ते सहभागी होते सहभागी होते.

टीआरएस प्रमुख अब्बास शेख आणि त्याचा सहकारी (उप) साकीब मंजूर हे शहरातील अलोची बाग परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की , “आम्हाला त्या परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती होती. साध्या गणवेशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिसराला वेढा घातला गेला आणि दहशतवाद्यांना आव्हान दिले आणि नंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि त्यात दोघेही ठार झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT