Jammu And Kashmi
Jammu And Kashmi Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: जम्मूतील स्फोटात तीन ठार, 20 हून अधिक जखमी

दैनिक गोमन्तक

जम्मूच्या रेसिडेन्सी रोड परिसरात झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट एका दुकानात झाला. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. स्फोटाचे कारण शोधले जात आहे. घटनास्थळावरुन अनेक पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. (Jammu blast kills three injures more than 20)

दरम्यान, सोमवारी संध्याकाळी रेसिडेन्सी रोडवर भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला. शहरातील गजबजलेल्या परिसरात स्फोटाच्या घटनेने अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले. लोकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.

परिसरात सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त तैनात

स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. या स्फोटाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हा एलपीजी सिलेंडरचा स्फोट असल्याचा संशय आहे, परंतु प्लॉट पॉईंटवर देखील तपास केला जात आहे. पोलिस आणि इतर सुरक्षा दलांची संयुक्त पथके मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT