Jammu and Kashmir: Two soldiers lost lives in counter attack in Poonch encounter  Twitter @ ANI
देश

Jammu and Kashmir: भारतीय जवानांचे पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशन सुरु, दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुंछ (Poonch Encounter) जिल्ह्याच्या मेंढर उपविभागात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई दरम्यान दोन जवान शहीद झाले आहेत

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुंछ (Poonch Encounter) जिल्ह्याच्या मेंढर उपविभागात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई दरम्यान, भींबर गलीमध्ये कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने (Indian Army) ही माहिती दिली असून मागील अनेक दिवसांपासून आतापर्यंत एकूण सात जवान शहीद झाले आहेत.काश्मिरात 11 ऑक्टोबरपासून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.(Jammu and Kashmir: Two soldiers lost lives in counter attack in Poonch encounter)

यापूर्वी पूंछ राजौरीच्या मांडू पोलीस ठाण्यात जेसीओसह पाच जवान शहीद झाले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, सीमावर्ती जिल्ह्यातील पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागातील डेरा की गली जवळच्या गावात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सैनिक ठार झाले होते . अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नियंत्रण रेषा ओलांडलेल्या दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली होती.

या साऱ्या प्रकरणांनंतर पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, पुंछ जिल्ह्यातील सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी दोन ते तीन महिने या परिसरात होते. गेल्या काही दिवसांपासून जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षा दलाने अवघ्या दोन आठवड्यांत 10 दहशतवाद्यांना ठार केले आहे. बुधवारीच सुरक्षा दलाने पुलवामाच्या त्राल भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर शाम सोफी याला देखील ठार केले आहे.

दरम्यान काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आता अल्पसंख्यकांना लक्ष करत आहेत. त्याचबरोबर ते सातत्याने सामन्यांनवर आणि लष्करावर सतत हल्ले करत आहेत. जम्मू काश्मिरात कलम 370 हटवल्यानंतर दहशतवाद मोठ्या प्रमाणात कमी झालेला दिसत आहे , परंतु बदललेल्या रणनीतीसह या साऱ्या परिसरात दहशतवाद पुन्हा पाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

SCROLL FOR NEXT