'देशाची फाळणी म्हणजे दुःखद इतिहास'; मोहन भागवतांची खंत

मनात असेलेली भेदभावाची भावना सर्वांनी सोडली पाहिजे आणि साऱ्यांनी समाज जोडणारी भाषा वापरली पाहिजे असे सांगत मोहन भागवत राष्ट्रीय एकात्मते बद्दल आपले मत मांडले आहे.
Partition of Indian is sad history says RSS Chief Mohan Bhagwat in Dussehra Melava Nagpur
Partition of Indian is sad history says RSS Chief Mohan Bhagwat in Dussehra Melava Nagpur Dainik Gomantak
Published on
Updated on

विजयादशमीच्या (Dussehra) सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपूर येथील कार्यालयात संघाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला (RSS dasara melava) या सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी संबोधन केले या भाषणात मोहन भागवत यांनी देशाला हे वर्ष आपल्या स्वातंत्र्याचे (Independence India) 75 वे वर्ष आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वतंत्र झालो. देशाला पुढे चालवण्यासाठी आपण आपल्या देशाचे धागे आपल्या हातात घेतले. स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्यापर्यंतच्या आमच्या प्रवासाचा तो प्रारंभ बिंदू होता. हे स्वातंत्र्य आपल्याला एका रात्रीत मिळाले नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे.असे सांगतच त्यांनी राष्ट्रीय एकात्मते बद्दल आपले मत मांडले आहे. (Partition of Indian is sad history says RSS Chief Mohan Bhagwat in Dussehra Melava Nagpur)

स्वतंत्र भारताचे चित्र कसे असावे, भारताच्या परंपरेनुसार, देशाच्या सर्व प्रदेशातून सर्व जातींतून बाहेर आलेल्या वीरांनी तपश्चर्या आणि त्यागाचा हिमालय उंचावला; गुलामगिरीचा सामना करणारा समाजही त्यांच्यासोबत उभा राहिला; मग शांततापूर्ण सत्याग्रहापासून सशस्त्र संघर्षापर्यंतचे सर्व मार्ग स्वातंत्र्याच्या टप्प्यावर पोहोचू शकले असे सांगतच मोहन भागवत यांनी देशासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे. देशाच्या स्वतांत्र्यासाठी साऱ्यांनी बलिदान दिलं. काही लोकांनी आपल्याच लोकांना विसरलं म्हूणून देशात अडचणी वाढल्या आहेत. असे स्प्ष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पण आपल्या जर्जर मानसिकतेमुळे, स्वधर्माच्या आकलनाचे अज्ञान, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य, संदिग्धता, डगमगणारे धोरण आणि त्यांच्यावर खेळत असलेले ब्रिटिश मुत्सद्दीपणामुळे, कधीही न विझवता येणारी फाळणीची वेदना देखील प्रत्येकाच्या हृदयात स्थिरावली त्याचबरोबर देशाचं विभाजन म्हणजे देशाचा दुःखद इतिहास आहे असे सांगत ज्यामुळे विभाजन झाले अशा चुकांची पुनरावृत्ती नको आणि त्या कारणांना जाणून घेऊन साऱ्यांनी पुढे गेले पाहिजे. देशाची हरवलेली अखंडता पुन्हा मिळवायची असेल तर तरुणांनी देशाचा इतिहास जाणून घेतलाच पाहिजे. असे आवाहन देखील सरसंघचालकांनी केले आहे.

Partition of Indian is sad history says RSS Chief Mohan Bhagwat in Dussehra Melava Nagpur
Monsoon Update: देशातून मान्सून परतीच्या वाटेवर, मात्र काहीं राज्यात पाऊस सुरूच

आपल्याच चुकांमुळे लोकं बाहेरून आले आणि आपल्यावर राज्य करून गेले. मनात असेलेली भेदभावाची भावना सर्वांनी सोडली पाहिजे आणि साऱ्यांनी समाज जोडणारी भाषा वापरली पाहिजे. असे सांगत मोहन भागवत यांनी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com