Jammu and Kashmir: Security forces launch joint operation against terrorists Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलांचे संयुक्त ऑपरेशन सुरू

सुंबलार परिसरातील शोकबाबा जंगलात ही चकमक सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू काश्मीर एथिल उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा येथे दहशतवाद्यांसह सुरक्षा दलाची चकमक सुरू झाली आहे. सुंबलार परिसरातील शोकबाबा जंगलात ही चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाचे संयुक्त ऑपरेशन सुरू आहे.

जेंव्हा सुरक्षा दल शोकबाबा जंगलात शोध मोहिम राबवित असताना ही कारवाई झाली असल्याचे समजत आहे. यावेळी जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाचेही गोळीबार सुरू आहे. दोन ते तीन दहशतवादी येथे लपल्याची माहिती मिळाली आहे. सध्या अतिरिक्त सुरक्षा दलाला बोलावून संपूर्ण परिसराला घेराव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान कालच उत्तर काश्मीरच्या सोपोर येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता.याउलट दहशहतवाद्यांनीच सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी सांगितले की, “सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांना वारंवार शरण येण्याची संधी देण्यात आली होती. तथापि, शरण येण्याऐवजी त्यांनी जवाबी कारवाईस कारणीभूत ठरलेल्या संयुक्त शोध पक्षावर अंदाधुंद गोळीबार केला. चकमकीत लष्कर-ए टू तैबा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि घटनास्थळावरून त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT