Har Ghar Jal Dainik Gomantak
देश

Har Ghar Jal: देशात 60 % कुटुंबांना नळाद्वारे मिळतेय शुद्ध पाणी; गोव्यासह 5 राज्यात 100 % पूर्ती, केंद्राचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी जल जीवन मिशनची घोषणा केली होती.

Pramod Yadav

देशातील 60 टक्के ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे. भारतातील 1.55 लाखांहून अधिक गावे (एकूण गावांच्या 25 टक्के) आता 'हर घर जल' मध्ये समाविष्ट झाली आहेत. याचा अर्थ असा की या गावांमधील प्रत्येक घराला त्यांच्या आवारात नळाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

चालू वर्षात जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत जल जीवन मिशन अंतर्गत प्रति सेकंद एक टॅप कनेक्शन दिले जात आहे. 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांत दररोज सरासरी 86,894 नवीन नळजोडण्या देण्यात आल्याने ही उल्लेखनीय कामगिरी आहे. असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी जल जीवन मिशनची घोषणा केली होती. सर्व ग्रामीण कुटुंबांना नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा प्रमाणात (55 LPCD) पुरेशा दाबाने विहित गुणवत्तेचे पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट साकार केले जाईल. जल जीवन मिशनसाठी एकूण आर्थिक INR 3600 अब्ज (43.80 अब्ज युएस डॉलर) खर्च केला जाणार आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये हे मिशन सुरू झाले तेव्हा, 19.43 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी फक्त 3.23 कोटी (16.65 टक्के) कुटुंबांना नळाचे पाणी उपलब्ध होते. असे केंद्र सरकारने म्हटले आहे. दरम्यान, 4 एप्रिल 2023 रोजी 'हर घर जल' योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा देशाने गाठला आहे. देशातील 11.66 कोटी (60 टक्के) पेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या घरी नळपाणी पुरवठा करण्यात आला आहे. असा दावा केंद्राने केला आहे.

गोव्यासह पाच राज्यात 100 टक्के कव्हरेज

'हर घर जल' योजनेत गुजरात, तेलंगणा, गोवा, हरियाणा आणि पंजाब आणि तीन केंद्रशासित प्रदेश - अंदमान आणि निकोबार बेटे, दमण दीव आणि दादरा नगर हवेली आणि पुद्दूचेरी यांनी 100 टक्के कव्हरेज प्राप्त केले आहे. असा दावा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

गोव्यात अनेक ठिकाणी पाण्याची वणवण

'हर घर जल' योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्यात गोवा देशातील पहिले राज्य ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे 2022 मध्ये कौतुक करत शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, राज्यातील विविध तालुक्यात पाण्याची वणवण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अजूनही पाण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. तसेच, पाण्यासाठी महिला रस्त्यावर उतरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT