देश

Rajasthan: राजस्थानातील पिता-पुत्राने अमेरिकन महिलेला घातला 6 कोटींचा गंडा; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

Manish Jadhav

Fake Jewelry: राजस्थानची राजधानी जयपूरमधून एका अमेरिकन महिलेच्या फसवणूकीची घटना समोर आली आहे. बनावट दागिने देऊन या महिलेला 6 कोटींचा गंडा घातल्याची घटना जयपूरमध्ये उघडकीस आली आहे. सोन्या-चांदीचे काम करणाऱ्या पिता-पुत्राने चांदीच्या साखळीवर सोन्याचा मुलामा दिला. 300 रुपये किमतीचे दगड लाखोंचे हिरे म्हणून विकले. त्यासाठी त्यांनी बनावट प्रमाणपत्रही दिले.

दरम्यान, अमेरिकन महिलेकडून फसवणूक झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक केली. पिता-पुत्र फरार आहेत. या दोघांचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्वेलर्स पिता-पुत्राने जयपूरमध्ये फसवणुकीच्या रकमेतून तीन कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.

महिला दागिने खरेदी करुन अमेरिकेत व्यवसाय करत होती

अतिरिक्त पोलिस आयुक्त बजरंग सिंह यांनी सांगितले की, अमेरिकन महिला चेरिसने 18 मे रोजी जयपूरमधील मानक चौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. ती गेल्या दोन वर्षांपासून ज्वेलर्स राजेंद्र सोनी आणि त्यांचा मुलगा गौरव सोनी यांच्या संपर्कात होती. ती पिता-पुत्रांकडून दागिने खरेदी करायची आणि अमेरिकेत व्यवसाय करायची. या काळात तिने पिता-पुत्रांकडून सहा कोटी रुपयांचे दागिने खरेदी केले.

पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली

एप्रिल महिन्यात अमेरिकेतील एका प्रदर्शनात जेव्हा दागिने आणि हिरे प्रदर्शनकर्त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. हे दागिने बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. यावर चेरिसने पिता-पुत्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी तिचे बोलणे होऊ शकले नाही. दोन दिवसांपूर्वी ती जयपूरला पोहोचली. तिने पोलिसांना सांगितले की, ती सोनी पिता-पुत्रांच्या दुकानात गेली असता तिथे त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले. पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सीतापूराच्या लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर दागिने बनावट आढळले

गुरुवारी पोलीस सोनी पिता-पुत्रांच्या दुकानात पोहोचले असता तिथे कोणीही आढळून आले नाही. पोलिसांनी पीडितेला दिलेले दागिने सीतापूरा येथील प्रयोगशाळेत तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. यापूर्वी, बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या नंद किशोरला पोलिसांनी अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition Case: राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली, युरी आलेमाव यांचा घणाघात

Betim Accident: बेती-वेरे येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच अंत

T20 World Cup: शानदार विजयानंतर हिट मॅनचं विजयी सेलिब्रेशन, मैदानात गाढला 'तिरंगा'; हार्दिकला दिली जादू की झप्पी

DGP Jaspal Singh : डीजीपींची खुर्ची अस्थिर, बिश्णोईंकडे देणार ताबा

Goa Weather Update : राज्यात पाऊस @ ३५ इंच; सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक

SCROLL FOR NEXT