Speeding truck runs over roadside family killing four children in tragic accident ai generated images
देश

Accident News: दिवसभर फुगे विकले अन् रात्री काळ आला! भरधाव ट्रकने रस्त्यावरील कुटुंबाला चिरडले; 4 चिमुरड्यांचा जागीच मृत्यू VIDEO

Jaipur Hit And Run Accident Ajmer Road: जयपूरमध्ये अजमेर रोड येथील बायपासवर एक अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक 'हिट अँड रन'ची घटना घडली.

Manish Jadhav

Jaipur Hit And Run Accident Ajmer Road: जयपूरमध्ये अजमेर रोड येथील बायपासवर एक अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक 'हिट अँड रन'ची घटना घडली. एका भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने रस्त्याच्या कडेला फुगे आणि इतर लहान-सहान वस्तू विकून पोट भरणाऱ्या एका गरीब कुटुंबाला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या चाकाखाली आल्याने चार निष्पाप बालकांचा जागीच मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर दोन सदस्य गंभीररित्या जखमी झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रकचा वेग प्रचंड होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला लावलेली लोखंडी रेलिंग तोडत तब्बल 100 मीटरपर्यंत पुढे घसरत गेला. याच रेलिंगच्या आडोशाला हे कुटुंब झोपलेले होते. ट्रक थेट त्यांच्या अंगावरुन गेल्याने संपूर्ण कुटुंब त्याच्या कचाट्यात आले. धडक इतकी जोरदार आणि भयानक होती की, घटनास्थळावर रक्ताचे पाट वाहिले आणि मृतदेहांचे तुकडे रस्त्यावर विखुरले गेले. अपघातानंतर परिसरात एकच एकच आक्रोश आणि खळबळ उडाली. रात्रीच्या अंधारात झालेल्या या दुर्घटनेमुळे बायपासवर मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या भीषण अपघाताची (Accident) माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि सिव्हिल डिफेन्सचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरु करत गंभीर जखमी झालेल्या दोन जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या मते, जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. पोलिसांनी चारही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमार्टमसाठी पाठवले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन वाहन सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला असून, पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जयपूर शहरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT