Amit Shah and Narendra Modi  Dainik Gomantak
देश

PM मोदींची मिमिक्री करणं पडलं महाग! जबलपूर पोलिसांनी तरुणाला केलं गजाआड

अमित शाहांची मिमिक्री केली म्हणून पोलिसांनी तरूणाला ठोकल्या बेड्या

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची नक्कल करणाऱ्या एका व्यक्तीला जबलपूर पोलिसांनी अटक केली आहे. मिमिक्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि तो पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

हे प्रकरण ओमती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ओमती पोलिस स्टेशनचे प्रभारी एसपीएस बघेल यांनी सांगितले की, एक व्हिडिओ आमच्या समोर आला आहे ज्यामध्ये छोटी ओमाती येथील रहिवासी आदिल अली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नक्कल करतांना दिसत आहे. हे अशोभनीय कृत्य होते, आम्ही स्वतः या प्रकरणाची दखल या घेत तरुणावर कारवाई करून त्याला अटक केली आहे.

काय प्रकरण आहे

रिपोर्टनुसार, नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात काही मुलं बसली होती. यापैकी 1 मुलगा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नक्कल करू लागला .तो नक्कल करत असताना त्याच्यासोबत बसलेल्या एका मित्राने हा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. तो व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. यानंतर हा व्हिडिओ आजवाजूच्या परिसरात पसरला. आणि पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलीसांनी या प्रकरणाची लगेच दखल घेत कारवाई करायला सुरवात केली. पोलिसांनी कारवाई एवढ्या वेगाने केली की, व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या काही तासातच तरुणालाही अटक करण्याल आली.

एका मित्राने हा व्हिडिओ व्हायरल केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेचा व्हिडिओ मुलाच्या मित्राने बनवला होता. व्हिडिओमध्ये सर्व मित्र एकत्र आहेत. अचानक यापैकी आदिल नावाच्या मुलाची ओळख पटली आणि त्याला अटक करण्यात आली.आणि नंतर सर्व प्रकरणाचा शोध लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

Saint Francis Xavier Exposition: संशयित व्यक्तीची होणार चौकशी, CCTV तैनात; 98 टक्के काम पूर्ण; मुख्यमंत्री सावंत

IFFI Goa 2024: 'मोबाईल थिएटर' इफ्फीचे खास आकर्षण; प्रेक्षकांना मिळणार RRR आणि अपराजितोचा फिरता अनुभव

Today's Live Updates Goa: शव प्रदर्शन सोहळा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनणार आहे: मुख्यमंत्री

St. Xavier Exposition: 46 दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; जाणून घ्या सर्व पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था

SCROLL FOR NEXT