PK लावणार काँग्रेसची नौका पार? चार दिवसांत सोनिया गांधींसोबत तिसरी भेट

काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निवासस्थानी '10 जनपथ'वर आजही मोठी बैठक सुरू आहे.
Prashant Kishor meets Sonia Gandhi
Prashant Kishor meets Sonia GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निवासस्थानी '10 जनपथ'वर आजही मोठी बैठक सुरू आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) आजही काँग्रेसच्या बड्या नेत्यांसमोर प्रेझेंटेशन देत आहेत. काँग्रेस अध्यक्ष आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रेझेंटेशन देण्यासाठी प्रशांत किशोर 10 जनपथवर पोहोचण्याची गेल्या चार दिवसांतील ही तिसरी वेळ आहे. कालही बैठक तब्बल 4 तास चालली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा (Loksabha) निवडणुकीसाठी (Election) काँग्रेसची रणनीती तयार करत आहेत. प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी यापूर्वीच प्रेझेंटेशन दिले आहे. (Prashant Kishor meets Sonia Gandhi For Election Strategist of lok sabha 2024)

Prashant Kishor meets Sonia Gandhi
''मामा जरा जपून-जपून'' लग्नसमारंभात 'सरकार' चा जिन्यावरुन गेला तोल, पाहा VIDEO

आता ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर राज्यनिहाय निवडणुकीच्या रणनीतीबाबत प्रेझेंटेशन देत आहेत. आजच्या बैठकीला सोनिया गांधी, प्रशांत किशोर, कमलनाथ, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल, अंबिका सोनी उपस्थित आहेत. आजच्या बैठकीत मध्य प्रदेशवरही चर्चा होणार आहे. पुढील वर्षी मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीला कमलनाथही उपस्थित आहेत. यापूर्वी 16 एप्रिल रोजी प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाला काय सूचना दिल्या आहेत?

वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधींना सुचवले आहे की काँग्रेसने उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये स्वबळावर निवडणूक लढवावी, तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांशी युती करावी. त्यांच्या या सूचनेला राहुल गांधी यांनी संमती दिली आहे. ANI नुसार, सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसकडे प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी 2 मे पर्यंत वेळ आहे, ज्यात म्हटले आहे की देशातील सर्वात जुन्या पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 370 जागांवर आपले उमेदवार उभे करावेत आणि काही विशिष्ट जागांवर उमेदवार उभे करावेत.

Prashant Kishor meets Sonia Gandhi
गुजरातमध्ये PM मोदींच्या हस्ते 'बनास डेअरी' संकुलाचे उद्घाटन

पीके यांच्या सूचनेवर काँग्रेस नेत्यांची भूमिका काय?

सोनिया गांधी यांच्या '10 जनपथ' निवासस्थानी झालेल्या याआधीच्या बैठकीत प्रियांका गांधी वड्रा, मुकुल वासनिक, रणदीप सिंग सुरजेवाला आणि अंबिका सोनी उपस्थित होते. मात्र, प्रशांत किशोर आणि त्यांच्या प्रस्तावाबाबत काँग्रेसमध्ये असंतोष आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. कारण काँग्रेसचे थेट प्रतिस्पर्धी आणि पक्षाशी चांगले संबंध नसलेल्या पक्षांना आणि नेत्यांना सोबत घेऊन निवडणुकीची रणनीती बनवण्याचे कामही ते करत आहेत. या नेत्यांमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YSRCP प्रमुख जगन मोहन रेड्डी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा समावेश आहे. प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी आणि जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी यशस्वी निवडणूक प्रचार केला आहे. या दोन्ही नेत्यांना आपापल्या राज्यात सरकार स्थापन करण्यात यश आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com