It is My Mission To Rid The Country Of Corruption, Nepotism and Appeasement, Says Prime Minister Narendra Modi. Dainik Gomantak
देश

Independence Day 2023: पंतप्रधान मोदींचा या 'तीन' वाईट गोष्टींशी लढण्याचा निर्धार

Ashutosh Masgaunde

It is My Mission To Rid The Country Of Corruption, Nepotism and Appeasement, Says Prime Minister Narendra Modi:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त 10व्यांदा लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी मोदींनी आपल्या सरकारचे यश आणि आगामी भविष्यातील व्हिजन देशासमोर मांडले.

तसेच भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या तीन वाईट गोष्टी ज्या देशाला मागे ढकलत आहेत, त्याच्याशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

भ्रष्टाचार

आपल्या देशातील सर्व समस्यांच्या मुळाशी भ्रष्टाचार हा मुख्य मुद्दा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याने देशाची क्षमता हिरावून घेतली आहे. या भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहीन ही माझ्या व्यक्तिमत्त्वाची बांधिलकी आहे.

घराणेशाहीने आपला देश हिसकावून घेतला आहे, त्याला विळाखा घातला आहे.

तिसरी वाईट गोष्ट म्हणजे तुष्टीकरण. म्हणूनच माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्याला या तिन्ही वाईट गोष्टींविरुद्ध आपल्या सर्व शक्तीनिशी लढायचे आहे.

आपल्या देशाच्या आकांक्षा दडपणाऱ्या या गोष्टी फोफावल्या आहेत. आपल्याला भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी आहे. या देशात गेल्या नऊ वर्षांत मी दहा कोटी लोकांना चुकीचा फायदा घेण्यापासून रोखले आहे.

घराणेशाही

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कॉंग्रेस पक्षावर आणि गांधी परिवारावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, लोकशाहीत असे कसे घडू शकते? देशात दुष्ट घराणेशाही पक्ष आहे. तो कुटुंबाचा, कुटुंबाने, कुटुंबासाठी चालवलेला पक्ष आहे.

तुष्टीकरण

तुष्टीकरणाने सामाजिक न्यायाची सर्वात मोठी हानी केली आहे. सामाजिक न्याय कोणी नष्ट केला असेल तर तो तुष्टीकरणाच्या राजकारणाने केला आहे. त्यातून सामाजिक न्यायाचा घात झाला आहे.

देशाचा विकास हवा असेल तर भ्रष्टाचार आपण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, हे आपल्यासाठी आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT