Independence Day PM Modi Speech: 'मणिपूरमध्ये जेव्हा काही घडते तेव्हा...' जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 7 महत्वाचे मुद्दे

Independence Day PM Modi Speech: देशाच्या विकासात शेतकरी, मजूर आणि श्रमिकांचा मोठा वाटा आहे.
Independence Day PM Modi Speech
Independence Day PM Modi SpeechDainik Gomantak
Published on
Updated on

Independence Day PM Modi Speech: मणिपूर मध्ये आता शांतता आहे मात्र जे काही मणिपूरमध्ये घडले ते वाईट आणि निंदनीय आहे याबरोबरच मणिपूरच्या जनतेने शांतता राखावी असे आवाहन नरेंद्र मोदींनी भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना केले आहे.

भारत आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधन करताना अनेक मुद्याची मांडणी केली आहे. त्यातील महत्वाचे पाच मुद्दे जाणून घेऊयात.

1. जगाला भारताच्या सामर्थ्यावर विश्वास

जेव्हा जग संकटात होते. जग वाईट अवस्थेतून जात होते तेव्हा भारताने या संकटावर मात करण्यासाठी योग्य पाऊले उचलली आणि संपूर्ण जगात विश्वास निर्माण केला

2. माझा युवाशक्तीवर विश्वास

देशाच्या विकासात शेतकरी, मजूर आणि श्रमिकांचा मोठा आहे. त्याचबरोबर विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातदेखील भारताने जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टार्टअप उद्योगात देश अग्रेसर असून ही भारताची शक्ती आहे. माझा युवाशक्तीवर विश्वास असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

3. राष्ट्र प्रथम हाच आमचा मूलमंत्र

सर्व गोष्टींच्या आधी देश प्रथम आहे. आधी देश येतो मग बाकी सगळे येते आणि हाच आमचा मूलमंत्र असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

4. कोरोनाने जगाला मानवी संवेदना ओळखायला शिकवले

कोरोनाने संपूर्ण जगाला माणसाला जास्त महत्व द्यायला शिकवले, मानवी संवेदना महत्वाच्या असतात हे कोरोणाच्या काळात माणूस शिकला. कोरोनातून बाहेर येण्यासाठी भारताने जगाला मदत केली आणि भारताची एक वेगळी बाजू जगासमोर आणली

5. भारत जगातील 3 री अर्थव्यवस्था होणार

जगातील अनेक देशांना महागाईचा अनेक देशांचा फटका बसला आहे. भारत या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे पण लवकरच भारत जगातील 3 री अर्थव्यवस्था होणार असे आश्वासन नरेंद्र मोदींनी जगाला दिले आहे.

6. 2014 मध्ये देशाला मजबूत सरकार मिळाले

2014, 2019 मध्ये देशाला मजबूत सरकार मिळाले आहे. देशात आमचे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती झाली आहे. विकास करण्याचा प्रयत्न हे सरकार सातत्याने करत आहे. देशा सहकार क्षेत्राला बळ देण्यासाठी मंत्रालय तयार केले आहे. ८ कोटी लोकांनी देशात नवीन उद्योग सुरु केले .

7. देशाला G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्याची संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, राष्ट्रीय चेतना हा असा शब्द आहे, जो चिंतामुक्त आहे. आज ती राष्ट्रीय जाणीव सिद्ध करत आहे. आमचा जनतेवर विश्वास आहे, जनतेचा सरकार आणि देशावर विश्वास आहे. हा विश्वास आपल्या धोरणांचा, आपल्या चालीरीतींचा आहे.

देशाला G-20 शिखर परिषद आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. G-20 चे अनेक कार्यक्रम भारताच्या कानाकोपऱ्यात झाले आहेत. देशाच्या विविधतेची ओळख जगाला करून दिली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी मणीपूरच्या मुद्यावर संसदेत बोलत नाहीत यावरुन विरोधकांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. आज मोदींनी देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना मणिपूरच्या मुद्यापासून सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

'वन सन, वन हेल्थ, वन ग्रीड, वन अर्थ'चा नारादेखील यावेळी नरेंद्र मोदींनी दिला आहे. देशाला महासत्ता बनवण्यासाठी आपण 140 कोटी लोकसंख्या सामर्थ्यशाली असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com