Basavaraj Bommai Dainik Gomantak
देश

कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बदलणार का? अमित शहांच्या दौऱ्यावरुन चर्चांना आलं उधान

9 महिन्यांपूर्वीच बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना राज्याची कमान देण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. राज्यात भाजपकडून नेतृत्व बदल होऊ शकतो, अशी अफवा अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान उडवण्यात आली. 9 महिन्यांपूर्वीच बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना राज्याची कमान देण्यात आली होती.

दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले होते की, ''दिल्ली (Delhi) आणि गुजरातप्रमाणेच (Gujarat) पक्षाच्या नेतृत्वात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. परंतु मी असे म्हणत नाही की, ते सगळीकडेच होईल, परंतु भाजप असे निर्णय घेण्यास सक्षम आहे. ज्याची इतर राजकीय पक्ष कल्पनाही करु शकत नाहीत.''

तसेच, बोम्मई यांनी बीएस येडियुरप्पा यांची जागा घेतल्यानंतर कर्नाटकात आणखी एक बदल होण्याची शक्यता असल्याच्या वृत्तानंतर पक्षाच्या सरचिटणीसांनी हे वक्तव्य आले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ते आपल्या मंत्रिमंडळात बदल करण्याच्या तयारीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT