Infosys hiring 2026 Dainik Gomantak
देश

IT Company Jobs: फ्रेशर्स उमेदवारांसाठी खूशखबर! 'ही' मोठी IT कंपनी पुढच्या दोन वर्षांत 40,000 जणांना देणार नोकरी

Infosys hiring 2026: आयटी कंपनीत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिस लवकरच २० हजार पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करणार आहे.

Sameer Amunekar

मुंबई : आयटी कंपनीत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिस लवकरच २० हजार पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. या भरती 2026 या आर्थिक वर्षासाठी असतील आणि विशेष म्हणजे या नोकऱ्या फ्रेशर्ससाठी आहेत. म्हणजेच महाविद्यालयीन पदवीधर यासाठी अर्ज करू शकतील.

आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसनं चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीत 6,806 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. इन्फोसिसचा तिसऱ्या तिमाहीतील महसूल 41,764 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

आर्थिक वर्ष 2023- 24 तुलनेत इन्फोसिसच्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीत 11.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर इन्फोसिसकडून 2025 मध्ये 15 ते 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर 2026 या आर्थिक वर्षात 20 हजार जणांना नोकऱ्या देण्यात येणारेत. त्यामुळे दोन वर्षात इन्फोसिसमध्ये तब्बल 40 हजारहून अधिक फ्रेशर्सना संधी देण्यात आली.

इन्फोसिसनं ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत ५.५९१ जणांना नव्यानं नोकरी दिली आहे. सध्या इन्फोसिसमध्ये ३ लाख २३ हजार ३७९ कर्मचारी कार्यरत आहेत. इन्फोसिसनं येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२५-२६ मध्ये २० हजार फ्रेशर्सना संधी देण्याची घोषणा केलीय.

इन्फोसिसचे इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी जयेश संघराजका यांनी सांगितलं की, "चालू आर्थिक वर्षात फ्रेशर्सच्या भरतीसाठी मनुष्यबळाचा आढावा घेत आहोत. या आर्थिक वर्षात १५ हजारांपेक्षा अधिक फ्रेशर्संना नोकरीची संधी दिली जाईल. येत्या आर्थिक वर्षात या संख्येत वाढ होऊन ही २० हजारांपर्यंत जाईल," असं ते म्हणाले.

इन्फोसिस कंपनीची वैशिष्ट्ये

इन्फोसिस ही भारतातील एक आघाडीची आयटी (IT) सेवा व सल्लागार कंपनी आहे. ती जगभरातील कंपन्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग (ML), ब्लॉकचेन आणि IT सल्लागार सेवा पुरवते.

इन्फोसिस भारतातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी आहे. पहिल्या क्रमांकावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही IT कंपनी आहे. इन्फोसिस ५० पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा पूरवते. या कंपनीनं लाखो लोकांना रोजगाराच्या संधी

इन्फोसिस ही भारतातील पहिली IT कंपनी होती, जिने NASDAQ स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग मिळवले (१९९९). कंपनीने २०२१ मध्ये Infosys Springboard नावाचा उपक्रम सुरू केला, जो विद्यार्थ्यांसाठी मोफत डिजिटल शिक्षण देतो. २०२३ मध्ये, इन्फोसिसने जगभरातील १०० हून अधिक मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT