ISRO: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने एक मोठे आव्हान पार केले आहे. तामिळनाडुतील महेंद्रगिरी येथे इस्त्रोच्या प्रोपल्शन कॉम्प्लेक्स (आयपीआरसी) च्या हाय अल्टिट्युड टेस्ट केंद्रात सीई-20 इंजिनाच्या उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. हे इस्त्रोचे सर्वात वजनदार रॉकेट इंजिन आहे. (ISRO Tests Heaviest Rocket Engine)
इस्त्रोकडून एलव्हीएम 3-एम 3 मिशनसाठी हे इंजिन बनवले गेले आहे. या मिशनअंतर्गत वनवेब इंडिया-1 चे 36 उपग्रह प्रक्षेपित केले जातील. सूत्रांच्या माहितीनुसार लंडनमधील उपग्रह कंपनी वनवेबचे हे उपग्रह पुढील वर्षात एलव्हीएम 3 वर इस्त्रोच्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेडद्वारे प्रक्षेपित केले जाऊ शकतात.
याआधी 23 ऑक्टोबर रोजी श्रीहरीकोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्रातून एनएसआयएल कडून 36 वनवेब उपग्रहांच्या पहिल्या सेटचे प्रक्षेपण केले गेले होते. एलव्हीएम३ रॉकेटद्वारे झालेले हे पहिलेच प्रक्षेपण होते.
नेटवर्क अॅक्सेस असोसिएटेड लिमिटेड (वनवेब) या लंडनच्या कंपनीच्या माहितीनुसार इस्त्रो आणि एनएसआयएल सोबत इस्त्रोच्या भागीदारीमुळे 2023 पर्यंत संपुर्ण देशात कनेक्टिव्हिटी पोहचवली जाईल. यात लडाखपासून कन्याकुमारी ते गुजरात पासून अरूणाचल प्रदेशपर्यंतचा समावेश आहे.
वनवेबचे अध्यक्ष सुनील भारती यांनी सांगितले की, या प्रक्षेपणासोतबच पृथ्वीच्या जवळील कक्षेत 648 उपग्रह सोडण्याची कंपनीची योजना आहे. आणखी चार उपग्रगहांचे प्रक्षेपण केल्यानंतर यातील ७० टक्के उपग्रहांचे काम होईल.
म्हणजेच 462 उपग्रह या कक्षेत स्थापित होतील. या उपग्रहांद्वारे जिथे इंटरनेट पोहचू शकत नाही, तिथे इंटरनेट पोहचवता येणार आहे. त्यानंतर जगभरात उच्च गतीची कनेक्टिव्हिटी मिळेल. वनवेबला सहा प्रक्षेपणांची गरज होती. कारण रशिया-युक्रेन युद्धामुळे त्यात खंड पडला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.