G20Summit In Srinagar Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: श्रीनगरमध्ये हाय अलर्ट! G-20 बैठकीपूर्वी ISI चे K-2 डेस्क सक्रिय; आत्मघातकी हल्ल्याचा धोका

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये 22 ते 24 मे दरम्यान G-20 ची बैठक होणार आहे.

Manish Jadhav

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये 22 ते 24 मे दरम्यान G-20 ची बैठक होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी अनेक देशांचे प्रतिनिधी सध्या भारतात आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

पाकिस्तान आणि चीन यापासून दूर आहेत. हा वादग्रस्त भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे, दहशतवादीही हल्ला करण्याची संधी शोधत आहेत.

लष्कराचे जवान, कमांडो यांनी श्रीनगरला चारही बाजूंनी वेढले आहे. लष्कराकडूनही संशयितांवर कारवाई करण्यात येत आहे.

गुप्तचर अहवालानुसार, G20 शिखर परिषदेसंदर्भात ISI चे K-2 डेस्क सक्रिय झाले आहे. K2 म्हणजे काश्मीर आणि खलिस्तान.

दरम्यान, श्रीनगर (Srinagar) दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. जी-20 बैठक कोणत्याही किमतीत त्यांना येथे होऊ द्यायची नाही. ते जगासमोर भारताची बदनामी करण्याचे नापाक षडयंत्र रचत आहेत.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर छापे टाकले जात आहेत.

इंटेलिजन्स इनपुटमध्ये आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फोर्सचा म्होरक्या तनवीर अहमद राथेर याने जी-20 च्या निमित्ताने खोऱ्यात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता.

खोऱ्यात सर्वत्र सुरक्षा दल तैनात

खोऱ्यात राजौरीसारखी दहशतवादी घटना घडवून अशांतता पसरवण्याचा कट जैशचे दहशतवादी रचत आहेत. G20 च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय मंचावर काश्मीरचा मुद्दा बनवून भारताची प्रतिमा खराब करणे हा त्यांचा उद्देश आहे.

जम्मू-काश्मीर पोलीस (Police) आणि लष्कराने आज जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात छापा टाकला. पुढील आठवड्यात जी-20 ची महत्त्वाची बैठक होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुरक्षा सतर्क करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सतर्कता वाढवण्यात आली आहे.

श्रीनगर नववधू सारखे सजले

श्रीनगरमध्ये G-20 ची बैठक होणार आहे. त्यामुळे शहर नववधूप्रमाणे नटले आहे. ऐतिहासिक वास्तूंचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय, प्रसिद्ध वास्तूही सजवण्यात आल्या आहेत.

तयारी पूर्ण झाली आहे, पण दहशतवाद्यांना हे प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचे नाहीत. दहशतवादी आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. खोऱ्यात सर्वत्र लष्कर आणि पोलिस कमांडो दिसत आहेत. सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT