Jammu and Kashmir: जम्मूमध्ये शस्त्रे आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी पाकिस्तान आता अत्याधुनिक ड्रोनचा वापर करत आहे. यासोबतच सुरक्षा दलांच्या नजरा चुकवण्यासाठी पाकिस्तान आता खूप उंचीवर ड्रोन उडवत आहे. दरम्यान, भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या या कारवाया उधळून लावल्या आहेत.
नुकतेच जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील विजयपूर भागात पाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेले पॅकेट सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. या जप्त केलेल्या पाकिटातून सुरक्षा दलांनी तीन चिनी पिस्तूल, 6 मॅगझिन, 48 जिवंत काडतुसे आणि 4 हातबॉम्ब जप्त केले आहेत.
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांना पॅकेटजवळ अनेक मीटर लांब दोरी सापडली असून त्यावरून हे ड्रोन 70 ते 80 फूट उंचीवर उड्डाण करत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागरिक आणि सुरक्षा दलांना दिसू नये म्हणून मोठ्या उंचीवरून शस्त्रे पाठवण्यात आले.
पाकिस्तान आता भारतात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांची तस्कारी करण्यासाठी हाय अल्टिट्यूड ड्रोनचा वापर करत आहे. यासोबतच पाकिस्तान आता अशा ड्रोनचाही वापर करत आहे, ज्यामध्ये केवळ आवाज कमी नाही तर उडताना चमकणारे दिवेही वापरले जात नाहीत.
सुरक्षा यंत्रणांच्या मते, पाकिस्तान भारतात दहशत पसरवण्यासाठी नवनवीन डावपेच अवलंबत आहे. पाकिस्तानच्या या कारवायाही सुरक्षा दले उघड करत असतात, ज्यासाठी त्यांना हाणून पाडण्यासाठी सतत कारवाया केल्या जातात.
विशेष म्हणजे, गुरुवारीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनीही नियंत्रण रेषेला भेट दिली आणि तेथील ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान आपल्या कारवाया सोडत नाही आणि जम्मू-काश्मीरमध्ये सतत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.