IRCTC Amazing Goa Ex Rajkot: Dainik Gomantak
देश

IRCTC Goa Package: गुजरातच्या पर्यटकांसाठी रेल्वेचे खास पॅकेज; 5 रात्री, 6 दिवसांची ट्रिप

गोव्यातील प्रेक्षणीय स्थळे, क्रुझ बोट, हॉटेल स्टेचा समावेश

Akshay Nirmale

IRCTC Amazing Goa Ex Rajkot: पर्यटकांचे नंदनवन अशी ओळख असलेल्या गोव्यातील पर्यटनासाठी विविध टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या विविध पॅकेजिस उपलब्ध करून देत असतात. अलीकडच्या काळात सरकारी कंपनी असलेल्या इंडियन रेल्वेच्या IRCTC या कंपनीनेही देशभरातील विविध राज्यांतून गोव्यासाठी अशी विविध पॅकेजिस देऊ केली आहेत.

IRCTC ने आता गुजरातमधील राजकोटमधून असे एक पर्यटन पॅकेज आणले आहे. 5 रात्री आणि 6 दिवसांचे हे पॅकेज आहे. आयआरसीटीसी अमेझिंग गोवा एक्स राजकोट असे या पॅकेजचे नाव आहे.

IRCTC ने राजकोटपासून सुरू होणाऱ्या 3rd AC आणि SL मध्ये कन्फर्म ट्रेन तिकिटांसह एक विशेष पॅकेज सुरू केले आहे. राजकोटहून दर सोमवारी ट्रेन सुटते. ही ट्रेन राजकोट, सुरेंद्रनगर, विरमगाम, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, अंकलेश्वर आणि सुरत ही बोर्डिंग स्टेशन आहेत.

पॅकेजची किंमत?

एका व्यक्तीसाठी सिंगल: 40200 रु तिकीट असेल तर दोन व्यक्ती असतील तर रु 25000 तर तिघांसाठी 21600 रुपये तिकीट असेल. SL मध्ये एका व्यक्तीसाठी 36700, दोघांसाठी 21500 तर तिघांसाठी 18100 रूपये तिकीट असेल.

असा असेल प्रवास

राजकोट रेल्वे स्थानकावरून 11 वाजता सुटते. ती दुसऱ्या दिवशी 10:45 वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल. तिथून हॉटेलमध्ये आणि तिसऱ्या दिवशी प्रवासी दक्षिण गोव्यातील पर्यटनासाठी जातील. शिवाय मिरामार बीच, ओल्ड गोवा चर्च आणि मंगेशी मंदिराला भेट देतील.

मग मांडवी नदीवर बोट क्रूझ आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या मुक्कामासाठी हॉटेलवर परत असा दौरा असेल.

चौथ्या दिवशी सकाळी नाश्ता, त्यानंतर आग्वाद किल्ला, कांदोळी, बागा बीच आणि हणजुणे बीचला, 5 व्या दिवशी नाश्ता केल्यानंतर हॉटेलमधून चेक आऊट. त्यानंतर मडगाव रेल्वे स्थानक येथे 10 वाजता ट्रेन मधून प्रवास असा हा प्रवास असेल. 6 व्या दिवशी राजकोट येथे 8:00 वाजता ट्रेनचे आगमन होऊन टूरची समाप्ती होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT