iQOO Z10 And iQOO Z10x Launch Dainik Gomantak
देश

iQOO Z10 आणि iQOO Z10x भारतात लॉंच, सर्वात मस्त बजेट फोन; किंमत किती पाहा

iQOO Z10 And iQOO Z10x Launch: स्मार्टफोन क्षेत्रात आपला ठसा उमठवणारी प्रसिद्ध ब्रँड iQOO ने आज भारतीय बाजारात iQOO Z10 आणि iQOO Z10x हे दोन नवीन मॉडेल्सचे लॉन्च केले आहेत.

Sameer Amunekar

स्मार्टफोन क्षेत्रात आपला ठसा उमठवणारी प्रसिद्ध ब्रँड iQOO ने आज भारतीय बाजारात iQOO Z10 आणि iQOO Z10x हे दोन नवीन मॉडेल्सचे लॉन्च केले आहेत. उत्कृष्ट परफॉर्मन्स, दमदार बॅटरी आणि आकर्षक डिझाईनसह हे स्मार्टफोन्स मध्यम श्रेणीतील ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहेत.

iQOO Z10 आणि Z10x या दोन्ही मॉडेल्समध्ये अत्याधुनिक प्रोसेसर, फास्ट चार्जिंग आणि उच्च रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेचा समावेश आहे. iQOO Z10 मध्ये 7,300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ती 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दुसरीकडे, iQOO Z10x मध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

हे दोन्ही फोन अँड्रॉइड 15 वर आधारित Funtouch OS 15 प्रणालीवर चालतात. फोटोग्राफीसाठी, यामध्ये 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत आणि व्हेरिएंट्स

iQOO Z10 तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

  • 8GB + 128GB साठी किंमत 21,999 रूपये.

  • 8GB + 256GB साठी किंमत 23,999 रूपये.

  • 12GB + 256GB साठी किंमत 25,999 रूपये.

iQOO Z10x खालील स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

  • 6GB + 128GB – 13,499 रूपये.

  • 8GB + 128GB – 14,999 रूपये.

  • 8GB + 256GB – 16,499 रूपये.

iQOO ने गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये विश्वासार्ह ब्रँड म्हणून स्थान मिळवलं आहे. गेमिंगसाठी योग्य हार्डवेअर, लांब टिकणारी बॅटरी आणि अपडेटेड सॉफ्टवेअर यामुळे iQOO चे डिव्हाइसेस तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. Z10 आणि Z10x हे त्याच परंपरेत भर घालणारे ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT