Virat Kohli Dainik Gomantak
देश

Virat Kohli Record: किंग कोहली करणार मोठा धमाका; 'इतक्या' धावा काढताच रचणार इतिहास

IPL 2025: आरसीबी संघाला आयपीएल २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध १३ वा लीग सामना खेळाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला आपल्या नावावर एक मोठा विक्रम करण्याची संधी असेल.

Sameer Amunekar

Virat Kohli IPL Record

आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत विराट कोहलीनं दमदार कामगिरी केली आहे. त्याने ११ डावांमध्ये ६३.१३ च्या सरासरीने ५०५ धावा केल्या आहेत. कोहलीच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर, आरसीबी संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे, तर आता त्यांचे लक्ष हंगामातील उर्वरित 2 लीग सामने जिंकून टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यावर आहे. आरसीबीला त्यांचा पुढचा सामना २३ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे आणि या सामन्यात विराट कोहलीला एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असेल.

विराट कोहली २००८ पासून आरसीबीकडून खेळत आहे, ज्यामध्ये तो आयपीएल व्यतिरिक्त चॅम्पियन्स लीगमध्ये संघाकडून खेळला आहे. कोहलीने आरसीबीसाठी २७८ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३९.५२ च्या सरासरीने ८९३३ धावा केल्या आहेत.

कोहलीच्या बॅटमधून ८ शतके आणि ६४ अर्धशतकांच्या डावही पाहायला मिळाल्या आहेत. जर कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आणखी ६७ धावा केल्या तर तो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एकाच संघाकडून खेळताना ९००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा पहिला फलंदाज बनेल.

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कोहलीच्या विक्रमावर नजर टाकली तर त्याने २३ सामन्यांमध्ये ३६.२९ च्या सरासरीने ७६२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली सध्या संजू सॅमसननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सॅमसनने हैदराबादविरुद्ध एकूण ८६७ धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT