IPL 2025 Playoffs Dainik Gomantak
देश

IPL 2025 Playoffs: गणित जुळलं, 3 संघ झाले सेट! आता प्लेऑफच्या एका जागेसाठी 'या' संघामध्ये चुरस

IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर प्लेऑफची शर्यत अधिकच रंगतदार झाली आहे. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्लेऑफसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

Sameer Amunekar

आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर प्लेऑफची शर्यत अधिकच रंगतदार झाली आहे. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्लेऑफसाठी आपली जागा निश्चित केली आहे. मात्र आता उरलेल्या एका जागेसाठी मुंबई इंडियन्स (MI), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर, गुजरात टायटन्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे आणि प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने ९ जिंकले आहेत आणि फक्त ३ मध्ये पराभव पत्करला आहे. १८ गुणांसह त्याचा नेट रन रेट अधिक ०.७९५ आहे.

दुसरीकडे, गुजरात जिंकताच, आरसीबी आणि पंजाब किंग्जनेही प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आरसीबी संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. त्याचा १७ गुणांसह नेट रन रेट अधिक ०.४८२ आहे. तो पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा नेट रन रेट ०.३८९ असून त्याचे १७ गुण आहेत.

आता तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत आणि फक्त एकच स्थान शिल्लक आहे, ज्यासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स (१३ गुण) आणि लखनौ सुपर जायंट्स (१० गुण) शर्यतीत आहेत. या तिन्ही संघांपेक्षा मुंबईकडे जास्त गुण असल्याने त्यांना अधिक संधी असल्याचे दिसते. १४ गुणांसह, त्याचा नेट रन रेट अधिक १.१५६ आहे आणि तो पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्स अजूनही टॉप-४ साठी सर्वात मजबूत दावेदार आहेत, मात्र एक चूक प्लेऑफमधून बाहेर फेकू शकते. दिल्लीला आता "करो या मरो" अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढील काही सामने निर्णायक ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT