International Masters League 2025 Dainik Gomantak
देश

IND vs SL: 'क्रिकेटचा देव' पुन्हा उतरणार मैदानात, श्रीलंकेविरुद्ध भिडणार भारत, मोफत कुठे पाहता येणार सामना? जाणून घ्या

International Masters League 2025: आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (IML) २०२५ आजपासून (२२ फेब्रुवारी) सुरू होत आहे.

Sameer Amunekar

International Masters League 2025

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (IML) २०२५ आजपासून (२२ फेब्रुवारी) सुरू होत आहे. लीगचा पहिला सामना इंडिया मास्टर्स आणि श्रीलंका मास्टर्स यांच्यात मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग आजपासून म्हणजेच शनिवार, २२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्याचा सलामीचा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात सचिन टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे आणि कुमार संगकारा श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

इंडिया मास्टर्स आणि श्रीलंका मास्टर्स यांच्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये सायंकाळी ७.३० वाजता सामना होईल. या सामन्यात दोन्ही देशांतील अनेक दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा खेळताना दिसतील.

या सामन्यात सचिन व्यतिरिक्त, भारतीय संघाकडून, धडाकेबाज अष्टपैलू युवराज सिंग, सुरेश रैना आणि युसूफ पठाण पुन्हा एकत्र खेळणार आहेत. तर इरफान पठाण आणि अंबाती रायुडू देखील श्रीलंका मास्टर्सला आव्हान देतील.

दुसरीकडे, श्रीलंका मास्टर्स संघाकडून कुमार संगकारा, उपुल थरंगा आणि सुरंगा लकमलसारखे दिग्गज खेळाडू खेळतील.

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये ६ संघ सहभागी होतील. भारत आणि श्रीलंका व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. वेस्ट इंडिज संघाकडून दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेल दिसतील. दुसरीकडे, महान अष्टपैलू जॅक कॅलिस आणि वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनी दक्षिण आफ्रिकेकडून खेळतील.

इंग्लंडकडून, ओएन मॉर्गन आणि मोंटी पानेसर सारखे अनुभवी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारताव्यतिरिक्त श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियानेही त्यांचे संघ जाहीर केले आहेत.

पहिला सामना किती वाजता सुरु होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ज्यासाठी टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल.

सामना टीव्हीवर कसा पहावा?

भारत आणि श्रीलंका यांच्यात आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामना Colors Cineplex (SD & HD) आणि Colors Cineplex सुपरहिट्सवर वाहिन्यांवर पाहता येईल.

सामना फ्रीमध्ये कुठं पाहता येईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा पहिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार वेबसाइट आणि मोबाईल अॅप्लिकेशनवर केलं जाईल. चाहते मोफत मोबाईलवर हा सामना लाईव्ह पाहू शकतात.

भारतीय संघ : सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंग, सुरेश रैना, अंबाती रायुडू, युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, विनय कुमार, शाहबाज नदीम, राहुल शर्मा, प्रज्ञान ओझा, पवन नेगी, गुरकीरत मान, मिथुन मन्हास.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

Aahana Kumra: 'पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, गोव्यात मला अटक झाली असती'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अनुभव

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Horoscope: गुरुवारी 'गजलक्ष्मी योग'चा शुभ संयोग! 'या' 5 राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास, होणार मोठा धनलाभ; भगवान विष्णूचीही राहणार कृपा

SCROLL FOR NEXT