उत्तर प्रदेश: पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा! संत तुकाराम महाराजांनी या प्रसिद्ध उक्ती काढल्या आहेत. असा करतबगार, पराक्रमी पुत्र व्हावा ज्याची किर्ती पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळात पसरेल, असा त्याचा अर्थ आहे. या उक्तीला साजेसे कतृत्व उत्तर प्रदेशमधील एका युवकाने करुन दाखवले आहे.
मथुरा येथील रहिवासी असणाऱ्या अमित कश्यप यांनी आई – वडिलांसाठी चक्क अमेरिकेत आलिशान घर खरेदी केले आहे. एवढेच नव्हे तर आलिशान कार खरेदी केली आणि दोघांनाही अमेरिका दर्शनही घडवले. आई – वडिलांनी मला शिकवण्यासाठी खूप कष्ट उपसले, त्यांनी घरातून दुसऱ्या शहरात देखील कधी पाय ठेवला नाही, असे कश्यप यांनी Instagram वर शेअर केलेल्या एका व्हिडिओत म्हटले आहे.
जीत सिंग कश्यप आणि क्रांती देवी असे अमितच्या बाबा आणि आईचे नाव आहे. अमित दोघांनाही मथुरा येथून अमेरिकेत घेऊन आला, त्यांना अमेरिका दर्शन घडवले. भारतातील एका छोट्या गावातून अमेरिकेतील चकचकत्या जगात पहिल्यांदाच त्यांनी पाऊल ठेवले असे अमित सांगतो. अमित आई- वडिलांसाठी अमेरिकेत आलिशान घर खेरदी केले आहे. एवढेच नव्हे बीएमडब्ल्यु कारही खरेदी केली आहे.
अमित आई – बाबांना घेऊन अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्राच्या (world Trade Centre) इमारतीत देखील गेला होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या १०४ व्या मजल्यावरुन त्यांनी अमेरिका पाहिली, असे अमितने शेअर केलेल्या व्हिडिओतून तो सांगतोय. आई – बाबांच्या कष्टाची जाणिव असणाऱ्या अमितचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मला इंजीनिअर करण्यासाठी आई- बाबांनी खूप कष्ट उपसले. आई मातीच्या चुलीवर भाकरी करायची. दोघांनी केव्हा घर सोडून कोणत्याही मोठ्या शहरात गेले नाहीत. माझी फी भरण्यासाठी त्यांनी खूप हालआपेष्टा सोसल्या असे अमित सांगतो. दरम्यान, अमितच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, इतरांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा असे नेटकरी मत व्यक्त करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.