Temple Dainik Gomantak
देश

Indore Temple Collapse: इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना, 10 जणांना वाचवण्यात यश; PM मोदी म्हणाले...

Indore Temple Collapse: आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

Manish Jadhav

Indore Temple Collapse: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात छत कोसळल्याने 25 हून अधिक बावडीमध्ये पडले.

भाविकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या नाहीत. मात्र, काही लोकांनी कसेबसे भाविकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

बावडीच्या छतावर लोक बसले होते

माहिती मिळताच पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाच्या पथकाने मदतकार्य सुरु केले. बावडीच्या आत किती पाणी आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रामनवमीला स्नेह नगरजवळील पटेल नगरमधील मंदिरात हवन सुरु होते.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इंदूर दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री शिवराज यांच्याकडून माहिती घेतली. इंदूरमधील घटनेमुळे मी खूप दुखावलो असल्याचे त्यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्याशी बोलून परिस्थिती जाणून घेतली. राज्य सरकार बचाव आणि मदत कार्यात वेगाने पुढे जात आहे. माझ्या संवेदना सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयाप्रती आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT