IndoGo Flight In Pakistan Space
IndoGo Flight In Pakistan Space Dainik Gomantak
देश

Indigo Flight: जायचे होते जम्मूला, पोहचले पाकिस्तानला! खराब हवामानाचा इंडिगो फ्लाइटला फटका

Ashutosh Masgaunde

IndoGo Flight In Pakistan Air Space: श्रीनगरहून जम्मूला जाणारे इंडिगो विमान पाकिस्तानच्या हवाई पोहोचले. ही घटना 25 जून रोजी दुपारी 4.15 च्या सुमारास घडली. खराब हवामानामुळे हे घडले.

इंडिगो विमानाच्या पायलटने विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत नेले. यावेळी विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत दोन त्यास घिरट्या घातल्या.

यापूर्वी 10 जून रोजीही एक भारतीय विमान पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते.

ज्यामध्ये इंडिगो फ्लाइट 6e-2124 काही काळासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसले होते, त्यानंतर ते अमृतसरच्या दिशेने वळवण्यात आले होते. एअरलाइन कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे फ्लाइट जम्मूला जात होते, तेव्हा खराब हवामानामुळे त्याचा मार्ग बदलावा लागला.

उड्डाणानंतर 28 मिनिटांनी हवामानात बदल

श्रीनगरहून इंडिगोचे विमान जम्मूसाठी निघाले. उड्डाणानंतर 28 मिनिटांनी खराब हवामानामुळे विमान जम्मू-काश्मीरमधील कोट जयमल मार्गे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत वळवण्यात आले.

पाकिस्तानी हवाई हद्दीत काही वेळ थांबल्यानंतर हे विमान सियालकोटमार्गे जम्मूच्या दिशेने निघाले. जम्मूमध्ये खराब हवामानामुळे विमान उतरवता आले नाही.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, याबाबत माहिती देताना इंडिगोच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पायलटने संबंधित अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती.

हवामान इतके खराब झाले होते की काही काळासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करणे भाग पडले, परंतु काही वेळातच विमान भारतीय हवाई हद्दीत परतले.
पायलट

विमान अमृतसरला उतरले

वैमानिकाने अधिकाऱ्यांना खराब हवामानाची माहिती दिली आणि सांगितले की, त्याला पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश करावा लागला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी परवानगी दिली.

अधिकाऱ्याने सांगितले की, या आपत्कालीन परिस्थितीत लाहोर आणि जम्मू एटीसीने चांगा समन्वय साधला. अखेर विमान अमृतसरला वळवण्यात आले. त्यानंतर विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

10 जून रोजीही भारताचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत

10 जून रोजी देखील अमृतसर विमानतळावरून अहमदाबादला जाणारे विमान खराब हवामानामुळे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत गेले होते. हे विमान 31 मिनिटे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या फ्लाईटने 10 जूनला भारतीय वेळेनुसार सकाळी 8:01 वाजता अमृतसरहून अहमदाबादला उड्डाण केले होते, परंतु काही वेळातच हवामान खराब झाले आणि विमानाला पाकच्या हद्दीत जावे लागले.

पाक नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान लाहोर, गुजरांवालाजवळ पाकिस्तानात घुसले.

त्या दिवशी रात्री मुसळधार पावसामुळे अमृतसर विमानतळावरून अहमदाबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सचे विमान हवामानाच्या समस्येमुळे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत पोहोचले. विमानाने सकाळी 8:00 वाजता उड्डाण केले, नंतर 8:01 वाजता पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि 8:30 च्या सुमारास परत भारतीय हद्दीत आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT