Indian Forex Reserves
Indian Forex Reserves Dainik Gomantak
देश

India's Forex Reserves: भारताचा परदेशी चलन साठा दोन वर्षातील निचांकी पातळीवर

गोमन्तक डिजिटल टीम

India's Forex Reserves: आधी कोरोना महारोगराई आणि त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे संपुर्ण जगच आर्थिक संकटातून जात आहे. त्यातच आता भारतातील परदेशी चलन साठ्यामध्ये मोठी घट झाली आहे. भारताच्या परदेशी चलन साठ्याने गेल्या दोन वर्षातील निचांकी पातळी गाठली आहे. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

एनएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताच्या परदेशी चलन साठ्याने दोन वर्षातील निच्चांक गाठला. 14 ऑक्टोबरपर्यंत भारतीच परदेशी चलन साठ्यात 528.367 अब्ज डॉलर शिल्लक राहिले आहेत. ही रक्कम गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी रक्कम आहे.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार गेल्या आठवड्याच्या तुलनेत या साठ्यामध्ये 4.5 अब्ज डॉलरची घट झाली होती. दरम्यान, या साठ्यात आणखी 2.828 अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यामुळे परदेशी चलन साठ्यात घट होऊन तो 468.668 अब्ज डॉलरवर आला आहे. तसेच भारतीय सोन्याच्या साठ्याचे मुल्यांकनही गतआठवड्याच्या तुलनेत घटले आहे.

भारताकडील सोन्याच्या साठ्यातही 1.5 अब्ज डॉलरची घट झाली आहे. आता भारतातील सोन्याच्या साठ्याचे मुल्य 37.453 अब्ज डॉलर राहिले आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत आणखी घसरू नये यासाठी आरबीआय मोठ्या प्रमाणात डॉलर्स खर्च करत आहे. त्यामुळेच रूपयाचा हळू हळू घसरत आहे. भारतीय रूपया डॉलरच्या तुलनेत ८३ वर आला आहे.

युक्रेन-रशिया युद्धाला सुरवात झाल्यापासून भारताच्या परदेशी चलन साठ्यातील जवळपास १०० अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. उर्जाविषय़क गरजांच्या पुर्ततेसाठी मोठा निधी खर्च करावा लागला आहे. या वर्षात भारतीय शेअरमार्केटमधून परदेशी गुंतवणुकदारांनी 26 अब्ज डॉलर काढून घेतले असून ते अमेरिकेत गुंतवले आहेत.

जगातील बहुतांश देशांची चलने डॉलरसमोर कमकुवत झाली आहेत. विशेषतः गरीब देशांवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. या वर्षात डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपया ११ टक्के कमकुवत झाला आहे. २० वर्षात प्रथमच एक युरोची किंमत १ डॉलरपेक्षा कमी झाली आहे. तर युके पाऊंडची किंमत १८ टक्क्यांनी घटली आहे. दरम्यान, तरीही भारतीय रूपया हे इतर चलनांच्या तुलनेत स्थिर चलन मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

China Crime: धक्कादायक! चीनमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू; तर 23 जण जखमी

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

SCROLL FOR NEXT