Delhi Vs Tokyo
Delhi Vs Tokyo Dainik Gomantak
देश

Delhi Vs Tokyo: राजधानी दिल्ली 'या' बाबतीत टोकियो शहराला टाकणार मागे

Akshay Nirmale

Delhi Vs Tokyo: नवीन वर्ष सुरू झाले आहे. गेल्या काही वर्षांत देशाने अनेक नवीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत, तर भविष्यात अजूनही अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. सध्या देशासमोर अनेक मोठ्या समस्या उभ्या आहेत, त्यातील एक समस्या म्हणजे वाढती लोकसंख्या. येत्या 2030 पर्यंत देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात शहरी लोकसंख्या इतकी वाढेल की ती जपानच्या टोकियोलाही मागे टाकेल.

सध्या जपानची राजधानी टोकियो हे शहर जगात सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेले शहर आहे आणि दिल्ली-एनसीआर दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण आता लवकरच दिल्ली-एनसीआर जपानच्या राजधानीला मागे टाकणार आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार सन 2030 पर्यंत दिल्ली एनसीआरची लोकसंख्या 30 दशलक्षाचा आकडा पार करेल आणि यासोबतचच दिल्लीचा समावेश टोकियो आणि शांघाय सारख्या शहरांच्या यादीत होईल. या यादीत या शहरांनंतर मेक्सिको सिटी, साओ पाउलो, ढाका, कैरो, मुंबई, बीजिंग आणि किन्हासा ही शहरे असतील. येथील जिथे 2 ते 3 कोटी लोकसंख्या असेल.

जग झपाट्याने शहरीकरणाचा अवलंब करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीवरून दिसून येते. 1950 साली 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली जगात फक्त 76 शहरे होती. 2030 पर्यंत अशा शहरांची संख्या 706 पर्यंत वाढेल. विशेष म्हणजे, त्यापैकी 173 शहरे एकट्या चीनची असतील. सन 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत 9.7 अब्जांपर्यंत पोहोचेल असा अंदाज या संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT