दुबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. याप्रसंगी स्मृती हिने टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम ७७१ रेटिंगची कमाई केली आहे.
स्मृती मानधना हिने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० लढतीत शतकी खेळी साकारली. या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने यजमान इंग्लंडचा धुव्वा उडवला आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. स्मृती हिने ६२ चेंडूंमध्ये ११२ धावांची संस्मरणीय खेळी साकारली.
तिने आपली खेळी १५ चौकार व ३ षटकारांनी सजवली. महिला फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्मृतीखेरीज भारतीय संघातील एकही खेळाडू नाही. वेस्ट इंडीजची हेली मॅथ्यूज ७७४ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी ७९४ रेटिंगसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर १२व्या स्थानावर (६२२ रेटिंग) आहे. तसेच भारतीय संघात पुनरागमन केलेल्या शेफाली वर्मा हिने १३वे स्थान (६१५ रेटिंग) पटकावले आहे. जेमिमा रॉड्रिग्ज हिने १४वे स्थान (६१२ रेटिंग) मिळवले आहे.
दीप्ती शर्मा दोन्ही विभागांत सरस
भारताची महिला संघातील अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने गोलंदाजी व अष्टपैलू या दोन्ही क्रमवारीत बाजी मारली आहे. दोन्ही विभागांत ती तिसऱ्या स्थानावर आहे.
रेणुका सिंग ही भारताची गोलंदाज सध्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सहभागी होऊ शकलेली नाही. दुखापतीमुळे ती या मालिकेत खेळत नाही. यामुळे तिची एक स्थानाने
घसरण झाली आहे. ती सहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दीप्तीशिवाय एकही भारताची खेळाडू अव्वल १० खेळाडूंच्या यादीत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.