Harmanpreet Kaur Dainik Gomantak
देश

World Cup 2025: वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ खेळाडूंकडे मोठी जबाबदारी; अनुभवी अन् युवा खेळाडूंचा मिलाफ

India Women's Squad For World Cup 2025: महिला वर्ल्ड कपसाठी (2025) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद भारत आणि श्रीलंका भूषवणार आहेत.

Manish Jadhav

Women World Cup 2025: महिला वर्ल्ड कपसाठी (2025) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद भारत आणि श्रीलंका भूषवणार आहेत. या मोठ्या स्पर्धेसाठी निवड समितीने काही मोठे आणि धक्कादायक निर्णय घेतले आहेत. संघाचे नेतृत्व अनुभवी खेळाडू हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आले असून उपकर्णधारपदाची जबाबदारी स्टार सलामीवीर स्मृती मानधना सांभाळेल. मात्र, संघातील सर्वात मोठा धक्का म्हणजे आक्रमक फलंदाज शेफाली वर्मा हिला 15 सदस्यीय संघातून वगळण्यात आले आहे.

शेफाली वर्माला वगळण्याचे कारण

मागील काही वर्षांपासून भारतीय संघाची महत्त्वाची सदस्य असलेल्या शेफाली वर्माला (Shafali Verma) वगळण्याचा निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शेफालीची अलीकडील काही सामन्यांमधील कामगिरी फारशी चांगली नव्हती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या फॉर्ममध्ये सातत्य नसल्यामुळे निवड समितीने हा कठोर निर्णय घेतल्याचे समजते. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत संघाला स्थिर आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची गरज असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. तिच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

वर्ल्ड कपची तयारी आणि अपेक्षा

भारतीय संघ (Team India) गेल्या काही काळापासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. वर्ल्ड कप भारतातच होणार असल्याने संघावर चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षांचे दडपण असेल. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ वर्ल्ड कपच्या जेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचला आहे, पण विजेतेपद काही हाती आले नाही. 2017 आणि 2020 च्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर आता ही प्रतीक्षा संपवण्याची संधी भारतीय संघाला आहे.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाने अनेक महत्त्वाच्या मालिका जिंकल्या आहेत, पण वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर प्रेक्षकांसमोर खेळणार असल्यामुळे, त्यांना मोठी मानसिक ताकद मिळेल.

आयसीसी महिला वर्ल्डकप 2025 साठी भारतीय संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौर, अमनजोत कौर, राधा यादव, चरकेतिया आणि श्रीकांत यादव. स्नेह राणा.

एकदरीत, हा संघ समतोल दिसत असून, निवड समितीने भविष्याचा विचार करुन काही धाडसी निर्णय घेतले आहेत. आक्रमक शेफाली वर्माला वगळून निवड समितीने कामगिरीलाच महत्त्व दिले आहे हे स्पष्ट झाले आहे. आता भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Tourism in Monsoon: हिरवाई, धबधबे आणि समुद्रकिनारे... पावसात खुललेलं 'कोकण', निसर्गाच्या कुशीतली 10 अप्रतिम स्थळं, नक्की भेट द्या

SA vs AUS: कांगांरुंची दैना उडवत दक्षिण आफ्रिकेनं मोडला 31 वर्ष जुना रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव, केशव महाराज ठरला विजयाचा 'हिरो'

Goa Police Attack: रस्त्यात अडवून पोलिसांना मारहाण, बेतूल घटनेनंतर वास्कोत 'गुंडाराज'; गोव्यात पोलिसांवर हल्ल्यांची मालिका?

Mumbai Heavy Rain: रस्ते पाण्याखाली, लोकल बंद, विमानसेवा विस्कळीत... देशाची 'आर्थिक राजधानी' तुंबली, पूरसदृश परिस्थितीने नागरिक हैराण Watch Video

Rohit Sharma Post: आशिया कपसाठी टीम जाहीर; क्रिकेटप्रेमी खूश, पण 'मुंबईचा राजा' टेन्शनमध्ये, स्टोरी टाकत म्हणाला, 'Stay Safe...'

SCROLL FOR NEXT