Indian army
Indian army Dainik Gomantak
देश

कुपवाडा-सोपोरमध्ये 3 दहशतवादी, 2 पाकिस्तानी ठार

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान भारताशी थेट दोन हात करु न शकत नाही. पण भारतासाठी शितयुद्धाचा अवलंब करत पाकिस्तान छुप्या मार्गाने भारतावर हल्ले करण्याच्या प्रयत्नात असतो. यासाठी वेगवेगळे प्रयत्न पाकिस्थानकडून होत असतात. असाच प्रयत्न पुन्हा एकदा पाकिस्तानकडून झाल्याचा प्रकार भारतिय सुरक्षा दलांनी हाणून पाडला. बीएसएफच्या जवानांना मंगळवारी जम्मू जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर एक ड्रोन दिसला होता. तो पाडण्यात काल सुरक्षा दलांना यश आले होते. (Indian soldiers clash with terrorists; Two terrorists killed )

सोमवारी रात्रीपासून जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबार सूरु आहे. या चकमकीत आज भारतीय जवानांच्या दहशतवाद्यांशी दोन चकमकी झाल्या यात तीन दहशतवादी ठार झाले आहेत. तर लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी सोपोर जिल्ह्यातील जलुरा भागात रात्री 10 वाजता आणि कुपवाडा येथे सकाळी 2 दहशतवादी मारले गेले. तीन दहशतवाद्यांपैकी दोन पाकिस्तानी, तर एक स्थानिक होता.

कुपवाडा येथे सकाळी 6 वाजता सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 पैकी दोन पाकिस्तानी आणि एक स्थानिक दहशतवादी ठार झाला. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे सांकेतिक नाव तुफैल आहे. इश्तियाक लोन असे दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव असून त्याने नुकताच दहशतवादाचा मार्ग पकडला. हा पाकिस्तानी दहशतवादी लाहोरचा रहिवासी होता. दहशतवाद्यांकडे जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून ही माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून दोन एके-56 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.

टार्गेट किलिंगमधील दहशतवाद्यांचा खात्मा सुरूच

आयजीपी काश्मीर विजय कुमार म्हणाले की, टार्गेट किलिंगमध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याची आणि त्यांचा खात्मा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राहुल भटच्या हत्येत दोन दहशतवाद्यांचा हात होता. त्यापैकी एक ठार झाला तर एक बाकी आहे. त्याचा शोध सुरूच आहे. अमरीन भटच्या हत्येमध्ये सहभागी असलेले दोन दहशतवादी मारले गेले आहेत. बँक मॅनेजर विजय कुमार हत्या प्रकरणातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल किंवा त्यांना संपवले जाईल. असे ही सांगितले आहे.

पाकिस्तानचा नापाक डाव हाणून पाडला

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पाकिस्तानचा नापाक डाव हाणून पाडला. बीएसएफच्या जवानांना मंगळवारी जम्मू जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर एक ड्रोन दिसला, ज्यावर सुरक्षा दलांनी गोळीबार केला. यादरम्यान ड्रोनने भारतीय हद्दीत आयईडी बॉम्ब टाकला.

दरम्यान, आयईडी बॉम्ब मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये ठेवून पाठवण्यात आला होता. वास्तविक, पाकिस्तानने (Pakistan) पाठवलेले एक संशयित ड्रोन अखनूर परिसरात दिसले. आधीच सतर्क असलेल्या सैनिकांनी या ड्रोनवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी संशयित ड्रोनमधून लटकलेल्या वस्तू खाली टाकल्या. तपासात तो आयईडी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सुरक्षा दलांनी तो बंद केला. या आयईडी बॉम्बमध्ये टायमर सेट करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT