Indian Railway Alert Dainik Gomantak
देश

Railway Alert: IRCTC प्रवाशांनी सोशल मीडियावर तक्रार नोंदवताना घ्यावी ही काळजी

Indian Railway Alert: जर तुम्हाला IRCTC च्या बनावट ट्विटर हँडलवरून कोणत्याही प्रकारची लिंक, कॉल किंवा मेसेज इत्यादी मिळत असतील तर तुम्ही तुमची तक्रार IRCTC च्या अधिकृत क्रमांकावर नोंदवू शकता.

दैनिक गोमन्तक

भारतीय रेल्वेच्या सेवा देशभरातील करोडो लोक वापरतात. हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. रेल्वेकडून दररोज हजारो गाड्या चालवल्या जातात. अनेक वेळा रेल्वे गाड्या रद्द करते. असावेळी तुम्हाला रिफंड मिळवण्यासाठी किंवा ट्रेनमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल तक्रार नोंदवावी लागेल. लोक इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या ट्विटर हँडलला भेट देतात. तुम्हीही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची तक्रार नोंदवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. (Indian Railway Alert News)

ट्विटर (Twitter) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर IRCTC चे अनेक बनावट हँडल बनले आहेत. यामुळे लोक सत्यापनाशिवाय या हँडलवर त्यांच्या तक्रारी नोंदवतात आणि त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करतात. यासोबतच ते परतावा मिळण्यासाठी माहिती डीएम करतात. तुम्हीही असे केले तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. IRCTC ने ट्विट करून या प्रकरणी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

IRCTC ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये, IRCTC ने म्हटले आहे की, 'आम्ही ग्राहकांना IRCTC सारखे दिसणार्‍या कोणत्याही संवेदनशील लिंक्स, कॉल्स किंवा ट्विटर हँडलपासून सावध राहण्याचे आवाहन करतो. तुमचा वैयक्तिक डेटा जसे की मोबाईल नंबर (Mobile) इत्यादी सोशल मीडियावर शेअर करू नका. तुमची कोणतीही तक्रार नोंदवण्यासाठी फक्त आमचे अधिकृत आणि सत्यापित ट्विटर हँडल वापरा.

जर तुम्हाला IRCTC च्या बनावट ट्विटर हँडलवरून कोणत्याही प्रकारची लिंक, कॉल किंवा मॅसेज आला तर तुम्ही IRCTC च्या अधिकृत क्रमांक 07556610661, 07554090600 वर तुमची तक्रार नोंदवू शकता. तसेच तुम्ही IRCTC च्या care@irctc.co.in या मेल आयडीला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT