Squid Game Dainik Gomantak
देश

Squid Game in Singapore : भारतीय व्यक्ती रातोरात लखपती; स्क्विड गेम्समध्ये जिंकले 11.5 लाख रुपये

Selvam Arumugam : सेल्वम यांनी कधीही स्क्विड गेम्सबद्दल ऐकले नव्हते. असे असूनही, त्याने यामध्ये यश मिळवत हा गेम जिंकला.

गोमन्तक डिजिटल टीम

सिंगापूरमधील भारतीय वंशाचा व्यक्ती रातोरात करोडपती झाला. खरं तर, भारतीय व्यक्ती ज्या कंपनीत काम करतो, त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी स्क्विड गेम्सचे आयोजन केले होते आणि या स्पर्धेच्या विजेत्याला बक्षीस म्हणून 11.5 लाख रुपये मिळाले.

Squid Games ही एक प्रसिद्ध कोरियन वेब सिरिज आहे, ज्याच्या धर्तीवर कंपनीने आपल्या Squid Games चे आयोजन केले होते.

भारतीय वंशाचे सेल्वम अरुमुगम (४२ वर्षे) हे सिंगापूरस्थित पॉलिसम इंजिनिअरिंग कंपनीत काम करतात. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी डिनर आणि डान्स इव्हेंटचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात, कंपनीने स्क्विड गेम्सच्या धर्तीवर स्वतःचा कार्यक्रम आयोजित केला होता.

ज्यामध्ये कर्मचारी स्क्विड गेम्सच्या पात्रांप्रमाणे लाल रंगाचे ट्रॅक सूट परिधान केले होते आणि त्यांना काही कठीण टास्क देण्यात आले होती. मात्र, यामध्ये वेब सिरिजप्रमाणे जीवाला धोका नव्हता.

सेल्वम यांनी हे टास्क यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रथम पारितोषिक पटकावले. बक्षीस म्हणून, सेल्वम यांना 18,888 सिंगापूर डॉलर्सचे बक्षीस मिळाले, जे भारतीय चलनात सुमारे 11.5 लाख रुपये आहे.

बक्षिसाची रक्कम दीड वर्षाच्या पगाराइतकी

सेल्वम यांना बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम त्यांच्या दीड वर्षांच्या पगाराएवढी आहे. विशेष म्हणजे सेल्वम यांनी कधीही स्क्विड गेम्सबद्दल ऐकले नव्हते. असे असूनही, त्याने आपले कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले. सेल्वम 2015 मध्ये कंपनीत रुजू झाले आणि त्यांचे कुटुंब अजूनही भारतातच राहते.

सेल्वम 15 लोकांच्या कुटुंबाला आधार देतात. सेल्वम यांचे आई-वडील आणि भाऊ मरण पावले आहेत. अशा परिस्थितीत भावाच्या कुटुंबाची जबाबदारीही त्याच्यावर आली आहे. सेल्वम यांना बक्षिस मिळाल्याची बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबीयांनाही खूप आनंद झाला आहे.

सेल्वम म्हणतात की बक्षिसाच्या रकमेतून ते भारतात घर बांधतील कारण त्यांचे कुटुंब सध्या भाड्याच्या घरात राहत आहे. त्याच वेळी, कंपनीचे संचालक ख्रिस अँग यांनी सांगितले की, कंपनीने गेल्या दोन वर्षांत खूप चांगले काम केले आहे. अशा परिस्थितीत त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचे होते आणि म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT