Indian Navy recruitment 2021 Facebook/ Indian Navy
देश

Indian Navy recruitment 2021: 350 नाविक एमआर पोस्टसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

पात्र पुरुष उमेदवार या रिक्त पदांसाठी (Indian Navy recruitment 2021) 23 जुलै 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर joinindiannavy.gov.in जावून अर्ज करु शकतात.

दैनिक गोमन्तक

इंडियन नेव्हीने नाविक एमआर पोस्टच्या 350 रिक्त जागेसाठी भरतीप्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र पुरुष उमेदवार या रिक्त पदांसाठी 23 जुलै 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर joinindiannavy.gov.in जावून अर्ज करु शकतात. अधिकृत अधिसूचनेनुसार नेव्हीच्या एकूण 350 रिक्त जागांसाठी सुमारे 1750 उमेदवारांना लेखी चाचणी व शारीरिक तंदुरुस्ती चाचणीसाठी (PFT) बोलावले जाईल. (Indian Navy recruitment 2021: job vacancies for 350 Sailor posts)

पात्रता

शैक्षणिक पात्रता : शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या कोणत्याही शालेय शिक्षण मंडळाकडून उमेदवाराने किमान मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा : उमेदवारांचा जन्म 01 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान झालेला असावा

वेतनश्रेणी: 21,700 – 69,100/- Level – 3"ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू नाही" आरोग्य राज्यमंत्र्यांचा अजब दावा

कार्यक्षेत्र

कूक : मेनूनुसार जेवण तयार करावे लागेल (यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांचा समावेस असेल) आणि रेशन अकाउंटिंग करावे लागेल. याशिवाय सेवेच्या आवश्यकतेनुसार इतर कामेही त्यांना देण्यात येणार आहेत.

स्टीवर्ड: त्यांना अधिकाऱ्यांच्या मेस मध्ये वेटर, हाऊसकीपिंग, फंडाचा हिशेब, दारू व स्टोर, मेनू तयार करणे इ. काम करावे लागतील. या व्यतिरिक्त त्यांना सेवेच्या आवश्यकतेनुसार इतर कामे देखील करावी लागतील.

हायजनिस्ट : त्यांना वॉशरूम, शॉवरची स्पेस आणि इतर क्षेत्र स्वच्छ करावे लागतील. याशिवाय सेवेच्या आवश्यकतेनुसार इतर कामेही त्यांना देण्यात येणार आहेत.

पात्रता परीक्षा

लेखी परीक्षेत (दहावीची परीक्षा) आणि पीएफटीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंगच्या टक्केवारीच्या आधारे निवड प्रक्रिया केली जाईल. रिक्त जागा राज्यनिहाय पद्धतीने देण्यात आल्या असल्याने कट ऑफ गुण प्रत्येक राज्य-राज्यात वेगवेगळे असू शकतात. अधिक माहीतीसाठी उमेदवार अधीकृत वेबसाईटला भेट देवू शकतात.

नेव्ही नाविक भरती 2021: अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. Joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  2. स्वतःची नोंदणी करा आणि प्रोफाइल तयार करा.

  3. ई-मेल आयडीसह लॉग-इन करा आणि तिथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

  4. "लॉग इन" बटणावर क्लिक करा आणि पोस्ट निवडा.

  5. आपला अर्ज पूर्ण भरा आणि त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा.

  6. फी भरा आणि अर्ज सबमिट करा.

  7. हा फॉर्म डाउनलोड करा आणि याची एक प्रिंटआउट घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT