Indian Navy Operation Dainik Gomantak
देश

Indian Navy Operation: भारतीय नौदलाची कौतुकास्पद कामगिरी! अपहरण केलेल्या जहाजाची केली सुटका

Indian Navy Operation: नंतर मार्कोस कमांडोना जहाजावर पाठवण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Indian Navy Operation rescued hijack ship

भारतीय नौदलाने कौतुकास्पद कामगिरी करत अपहरण केलेल्या जहाजाची सुटका केली आहे. याबरोबरच, 35 समुद्री चाच्यांना पकडल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी क्रूला कोणतीही हानी न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आयएनएस कोलकाताने एमव्ही रौन हे अपहरण केलेले जहाज भारतीय किनारपट्टीपासून 2600 किमी अंतरावर रोखले होते. INS सुभद्रा, ड्रोन आणि P8I सागरी गस्ती विमानांद्वारे चाच्यांवर नजर ठेवण्यात आली होती. नंतर मार्कोस कमांडोना जहाजावर पाठवण्यात आले.

भारतीय नौदलाने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये हेलिकॉप्टर जहाजाच्या जवळ आल्यावर समुद्री चाचे गोळीबार करताना दिसत आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेला एमव्ही रौन ( MV Ruen ) या जहाजावर दरोडेखोर असल्याची माहिती मिळाली होती. 14 डिसेंबर रोजी सोमाली चाच्यांनी त्याचे अपहरण केले होते.

समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर, जहाजावरील अवैध शस्त्रे, दारूगोळा वस्तू शोधण्यात आल्या आहेत. यामुळे शिपिंग मार्गांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. 15 मार्च रोजी नौदलाने जहाज ताब्यात घेतले. जहाज थांबवल्यावर दरोडेखोरांनी गोळीबार सुरू केल्याचे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. भारतीय नौदलाने 35 समुद्री चाचांना ताब्यात घेतले आहे.

भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते या प्रदेशातील सागरी सुरक्षा आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. नौदलाने एमव्ही रौन या जहाजावरील 17 जणांच्या क्रूसोबत यशस्वीरित्या संवाद साधला आहे. क्रूमध्ये अंगोला, बल्गेरिया आणि म्यानमारमधील लोकांचा समावेश आहे. येमेनचे हुथी बंडखोर लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले करत आहेत. त्याचेच अनुकरण करत समुद्री चाचेही हिंदी महासागरात जहाजांचे अपहरण करत आहेत. भारतीय नौदलाने गेल्या काही महिन्यांत अनेक जहाजांची सुटका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT