INS Nistar Dainik Gomantak
देश

INS Nistar: पाणबुडींना साह्य करणारी 'निस्तार' नौदलात दाखल, लवकरच येणार 'आयएनएस निपुण'

Indian Navy new rescue vessel: खोल समुद्रात बचाव मोहिमांसाठी वापरली जाणारी ‘निस्तार’ ही पाणबुडींना साह्य करणारी पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली.

Sameer Amunekar

नवी दिल्ली: खोल समुद्रात बचाव मोहिमांसाठी वापरली जाणारी ‘निस्तार’ ही पाणबुडींना साह्य करणारी पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेची निर्मिती ‘हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड’ने केली आहे.

या नौकेचे वापर ‘डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसल’साठी ‘मदरशीप’ म्हणूनही केला जाईल. पाणबुडीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा बचाव करणे त्यामुळे शक्य होणार आहे. नौदलात दाखल झालेली ‘आयएनएस निस्तार’ आणि लवकरच येणारी ‘आयएनएस निपुण’ यांच्यामुळे पाणबुडी बचाव मोहिमांमध्ये भारत आत्मनिर्भर होणार आहे.

निस्तार ही भारतातच डिझाईन केलेली आणि निर्मिती केलेली पहिली डायव्हिंग सपोर्ट व्हेसल असून ती हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने ८ जुलै रोजी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली.

नावाचा इतिहास

‘निस्तार’ हा मूळ संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ ‘मोक्ष’, ‘बचाव’ किंवा ‘मुक्ती’ असा होतो. हे नाव १९७१ च्या भारत-पाक युद्धात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या एका युद्धनौकेच्या सन्मानार्थ ठेवले आहे.

त्या काळात, ‘निस्तार’ नावाच्या जुन्या डायव्हिंग टेंडर युद्धनौकेने ‘पीएनएस गाझी’ या पाकिस्तानच्या पाणबुडीचा शोध घेऊन ती नष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही घटना विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर घडली होती. आजची ‘आयएनएस निस्तार’ म्हणजे त्या परंपरेचा एक आधुनिक, शक्तिशाली आणि पूर्णतः स्वदेशी आविष्कार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT