Indian Navy Dainik Gomantak
देश

Watch Video: शत्रूंचा थरकाप उडवणारे दृश्य! अरबी समुद्रात एकाच वेळी 35 लढाऊ विमाने आणि 2 विमानवाहू नौंका काय करत होत्या?

Ashutosh Masgaunde

Indian Navy Exercise in Arabian Sea

भारतीय नौदलाने नुकताच अरबी समुद्रात 35 लढाऊ विमाने आणि 2 विमानवाहू युद्धनौकांसह एक मोठा युद्धसराव केला.

या मेगा ऑपरेशनद्वारे भारताने समुद्री ताकदीचे अनोखे प्रदर्शन केले. अरबी समुद्रात भारताची ही ताकद पाहून चीन आणि पाकिस्तानला नक्कीच झोप येणार नाही.

हा लष्करी सरावही खास होता कारण त्यात आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य या महाकाय विमानवाहू नौकांचा समावेश होता. यासोबतच नौदलाने समुद्राच्या आत आपली ताकद दाखवण्यासाठी सबनरीनची चाचणीही घेतली.

नौदलाच्या विशेष सरावात 'ही' विमाने सहभागी

भारतीय नौदलाच्या या विशेष सरावात एक-दोन नव्हे तर 35 लढाऊ विमानांचा समावेश होता. या सरावात मिग-29 व्यतिरिक्त एमएच60आर, कामोव, सी-किंग, चेतक आणि एएलएच हेलिकॉप्टरने उड्डाण केले.

एवढेच नाही तर लढाऊ विमानांनी विमानवाहू जहाजावरून उड्डाण घेतले. आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य हे या सरावाचे मुख्य केंद्रबिंदू होते.

भारतीय नौदलाचे निवेदन

या विशेष युद्धसरावाबद्दल बोलताना भारतीय नौदलाने सांगितले की, भारतीय नौदलाने आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण, प्रादेशिक स्थिरता आणि सागरी सीमेची सुरक्षा लक्षात घेऊन हा सराव केला आहे.

भारतीय महासागर आणि त्यापलीकडे सागरी सुरक्षा वाढवण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांमध्ये हा सराव महत्त्वाचा टप्पा आहे. भारत आपली सुरक्षा यंत्रणा मजबूत करत आहे आणि देशाच्या संरक्षण धोरणाला आकार देण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी याबाबत संपूर्ण माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, हा सराव भारतीय नौदलातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

आठ तासांचा युद्धसराव

भारतीय हवाई दलाच्या सुखोई एसयू-30 एमकेआय लढाऊ विमानांच्या ताफ्याने अरबी समुद्र क्षेत्रात आठ तास रणनीतिक मोहीम राबवली. चार राफेल विमानांनी काही दिवसांपूर्वी अशीच मोहीम राबवली होती.  

महिन्याभरात दोन मोहिमा

राफेल लढाऊ विमानाचा समावेश असलेली सहा तासांची मोहीम गेल्या महिन्यात हिंदी महासागराच्या पूर्व भागात पार पडली.

एका ट्विटमध्ये, IAF ने म्हटले, "हिंद महासागर क्षेत्राचा आणखी एक प्रवास! यावेळी, IAF Su-30s ने वेगळ्या अक्षावर जवळपास आठ तास उड्डाण केले. या मोहिमेने दोन्ही सागरी किनारे व्यापले."  

चीन जेव्हा हिंदी महासागर क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवत आहे तेव्हा IAF ने दोन मोहिमा राबवल्या आहेत.  आयएएफने गुरुवारी आणि गेल्या महिन्याच्या अखेरीस केलेल्या या मोहिमांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

SCROLL FOR NEXT