Congress On BJP: ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन करून '10 डाऊनिंग स्ट्रीट' (पंतप्रधानांचे निवासस्थान) येथे पार्टीचे आयोजन करण्याच्या मुद्द्यावरून संसदेची दिशाभूल केल्याचा जॉन्सन यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, शनिवारी (10 जून) काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी जॉन्सन यांचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला टोला लगावला. ते म्हणाले की, ब्रिटनमधील संसदीय समितीने चौकशी केली असता तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन संसदेत खोटे बोलत असल्याचे आढळून आले. त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारण सोडले आहे, असे आणखी काही पंतप्रधान आहेत जे संसद आणि देशासमोर खरे बोलत नाहीत.
खरे तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीएम मोदींनी 'अच्छे दिन आने वाले है' असा नारा दिला होता. त्यावेळची आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत रमेश यांनी पीएम मोदींना टोला लगावला.
पार्टीगेट प्रकरणाच्या संसदीय समितीच्या चौकशी अहवालानंतर ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
संसदीय समितीने आपल्या तपासात पंतप्रधानपदावर असताना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून पार्टी केल्याबद्दल तसेच संसदेची दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
या सर्व प्रकारणानंतर जॉन्सन यांनी शुक्रवारी रात्री सांगितले की, 'सध्या संसद सोडणे खूप दु:खद आहे.' जॉन्सनने आपल्या वक्तव्यात 'सध्या’ हा शब्द वापरला होता, ज्याबद्दल विश्लेषकांचे म्हणणे आहे की, माजी पंतप्रधानांनी अद्याप आपली राजकीय पुनरागमनाची आशा सोडलेली नाही.
परंतु कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की जॉन्सन यांनी केवळ स्वतःच्या प्रतिष्ठेलाच नव्हे तर कंझर्व्हेटिव्ह पक्षाची ओळख देखील खराब केली आहे. त्यामुळे पक्षात त्यांच्यासाठी जागा उरलेली नाही.
बोरिस जॉन्सन यांना त्यांच्या सरकारमधील बंडखोरीमुळे जुलै 2022 मध्ये पंतप्रधानपद सोडावे लागले होते. तेव्हापासून ते म्हणत आहे की आपण काहीही चुकीचे केले नाही. उलट आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा करतात. तो म्हणाला- मला ज्याप्रकारे बाहेर फेकण्यात आले त्यामुळे मी दु:खी झालो आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.