Saudi Arabia Haj Yatra Dainik Gomantak
देश

Saudi Arabia Haj Yatra: हज यात्रेला गेलेल्या 98 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने केली पुष्टी

Ministry Of External Affairs: सौदी अरेबियातील मक्का येथे हजसाठी गेलेल्या 98 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे.

Manish Jadhav

Saudi Arabia Haj Yatra: सौदी अरेबियातील मक्का येथे हजसाठी गेलेल्या 98 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, यावर्षी भारतातून 1 लाख 75 हजार लोक हजसाठी मक्केला गेले आहेत. त्यापैकी 98 जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे, आजार आणि वृद्धापकाळामुळे झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. त्यापैकी 6 जणांचा अराफातच्या दिवशी मृत्यू झाला तर 4 जणांचा अपघाती मृत्यू झाला.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आमचे हज मिशन मक्कामध्ये काम करत आहे. प्रवाशांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकारच्या अपघातावर आम्ही तातडीने कारवाई करतो. प्रत्येकाची काळजी घेतली जातेय. गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान भारतातील 187 हज यात्रेकरुंचा मृत्यू झाला होता.

900 हून अधिक हज यात्रेकरुंचा मृत्यू

सौदी अरेबियात यंदाच्या कडक उष्णतेमुळे हज यात्रेदरम्यान जगभरातील 900 हून अधिक हज यात्रेकरुंचा मृत्यू झाला. सौदी अरेबियाच्या सरकारी टेलिव्हिजनने सांगितले की, मक्काच्या मस्जिद-ए-हराममध्ये सोमवारी तापमान 51.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले. वाढत्या तापमानामुळे आणि कडक उन्हामुळे यात्रेकरुंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, हज यात्रेला जाण्यापूर्वी यात्रेकरुंना करारावर स्वाक्षरी करावी लागते. ज्यामध्ये असे लिहिलेले असते की, हज करताना सौदी अरेबियाच्या भूमीवर कोणत्याही कारणांनी यात्रेकरुचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह तिथेच दफन करण्यात येईल. मृतदेह परत पाठवला जात नाही. कुटुंबीयांकडून मृतदेह परत करण्याचा दावा केला जात असला तरी सौदी अरेबिया सरकार ते मान्य करत नाही.

WHO ने इशारा दिला

नुकताच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा प्रखर उष्णतेबाबतचा रिपोर्ट समोर आला आहे. जगात उष्णतेमुळे दरवर्षी किमान पाच लाख लोकांचा मृत्यू होतो, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तथापि, आरोग्य एजन्सीने असाही इशारा दिला होता की वास्तविक मृतांची संख्या अनेक पटींनी वाढू शकते. सौदी अरेबियाने हज यात्रेदरम्यान उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूंबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. तथापि, अनेक मुस्लिम देशांनी त्यांच्या देशातील हज यात्रेकरुंच्या मृत्यूसाठी तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेला थेट जबाबदार धरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT