Saudi Arabia, Hajj Yatra 2024: उष्माघातामुळे आतापर्यंत 900 हून अधिक मृत्यू; 90 भारतीयांनीही गमावला जीव

Saudi Arabia: मक्का-मदिना येथे पोहोचलेल्या हज यात्रेकरुंच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. उष्माघातामुळे मृतांचा आकडा 900 च्या वर पोहोचला आहे तर 1,400 हज यात्रेकरु बेपत्ता आहेत.
Hajj Yatra
Hajj YatraDainik Gomantak

Severe Heat Kills Over 900 Hajj Pilgrims, Including 90 Indians: सौदी अरेबियातील भीषण उष्णतेने कहर केला आहे. मक्का-मदिना येथे पोहोचलेल्या हज यात्रेकरुंच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. उष्माघातामुळे मृतांचा आकडा 900 च्या वर पोहोचला आहे तर 1,400 हज यात्रेकरु बेपत्ता आहेत, असे एएफपीच्या वृत्तात म्हटले आहे.

अरब अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उष्णतेच्या लाटेत मरण पावलेल्यांमध्ये एकट्या 600 इजिप्शियन लोकांचा समावेश आहे, तर 68 भारतीय हज यात्रेकरुंचाही मृत्यू झाला आहे. मात्र, मक्का-मदिना येथे मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय हज यात्रेकरुंची एकूण संख्या 90 झाली आहे.

दरम्यान, सौदी अरेबियातील कडाक्याच्या उन्हातही यात्रेकरु मक्का-मदिना येथे हज यात्रा पूर्ण करत आहेत. वृत्तानुसार, इस्लामचे सर्वात पवित्र शहर मक्का येथे पोहोचलेल्या यांत्रेकरुंची संख्या आतापर्यंत 1.8 दशलक्षच्या पार झाली आहे. सोमवारी येथील तापमान 51.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले. बुधवारी एएफपीने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, उष्णतेच्या लाटेमुळे मृतांची संख्या 900 च्या पुढे गेली आहे. अरब अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एकट्या इजिप्तमधील 600 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Hajj Yatra
Saudi Arabia: सौदी अरेबियाची चांदी! इस्लामच्या पवित्र शहर मक्कामध्ये सापडला सोन्याचा मोठा साठा

नाव न सांगण्याच्या अटीवर एका अरब राजनयिक अधिकाऱ्याने एएफपीशी बोलताना सांगितले की, मृतांची संख्या एकट्या इजिप्तमधील (Egypt) 600 लोकांचा मृत्यू झाला आहे. एक दिवस आधी हा आकडा 300 पेक्षा थोडा जास्त होता. असह्य उष्णता हे मृत्यूचे कारण असल्याचेही त्यांनी सांगितले. विविध देशांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मक्का-मदिना यात्रेतील मृतांची संख्या 922 वर पोहोचली आहे. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांना इजिप्तमधील बेपत्ता यात्रेकरुंचे 1,400 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 600 लोक मरण पावले आहेत.

सध्या परिस्थिती अशी आहे की, लोकांनी आपल्या प्रियजनांचा शोध घेण्यासाठी फेसबुक (Facebook) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोहीम सुरु केली आहे. लोक त्यांच्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. सौदी अरेबियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये बहुतेक वृद्ध यात्रेकरु होते, ज्यांना उष्णतेची दाहकता सहन झाली नाही. त्यामुळे त्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला.

Hajj Yatra
Saudi Arabia: सौदी अरेबियाने परदेशी कामगारांसाठी व्हिसा नियम केले कडक, भारतावरही होणार परिणाम?

दुसरीकडे, यंदाच्या हज यात्रेदरम्यानच्या कडक उन्हाने सर्व विक्रम मोडले असून तापमान 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. 2023 मध्ये हज दरम्यान 200 हून अधिक यात्रेकरुंचा मृत्यू झाला आणि उष्णतेमुळे 2,000 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com