Pakistan High Commission Dainik Gomantak
देश

Pakistan High Commission: आणखी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारताने हाकलले; 24 तासांत देश सोडण्याचा दिला आदेश

India Expels Pakistani Diplomat: भारत सरकारने आणखी एका पाकिस्तानी अधिकाऱ्यावर कारवाई केली. या अधिकाऱ्याला ताबडतोब देश सोडण्यास सांगितले. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला भारताने पर्सोना नॉन ग्राटा म्हणून घोषित केले.

Manish Jadhav

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील धुमचक्री काहीशी थांबली असताना आता हेरगिरीच्या प्रकरणाने जोर धरला आहे. भारताशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला हेरगिरी प्रकरणात अटक केल्याने पुन्हा एकदा दोन्ही देशात तणातणी पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीस्थित पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याशी ज्योतीचे संबंध उघड झाल्यानंतर या प्रकरणाने जोर धरला.

यातच आता, भारत (India) सरकारने आणखी एका पाकिस्तानी अधिकाऱ्यावर कारवाई केली. या अधिकाऱ्याला ताबडतोब देश सोडण्यास सांगितले. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला भारताने पर्सोना नॉन ग्राटा म्हणून घोषित केले. याआधीही भारत सरकारने दानिश नावाच्या अधिकाऱ्याला देश सोडण्यास सांगितले. आता आणखी एका अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत देश सोडण्याचा आदेश दिला.

उच्चायुक्तालयाच्या प्रभारींनाही सूचना देण्यात आली

याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाने अशा प्रकरणांच्या संदर्भात पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या चार्ज डी अफेयर्संना एक निवेदनही जारी केले, ज्यामध्ये त्यांना ताकीद देण्यात आली की भारतातील कोणत्याही पाकिस्तानी राजदूताने किंवा अधिकाऱ्याने त्यांच्या विशेषाधिकारांचा गैरवापर करु नये.

प्रेस रिलीजमध्ये काय म्हटले?

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, भारत सरकारने आज नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला देशातील त्याच्या अधिकृत दर्जाच्या विरुद्ध असलेल्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आढळल्यानंतर त्याला पर्सोना नॉन ग्राटा म्हणून घोषित केले आहे. भारत सरकारने त्या अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले.

तसेच, आज पाकिस्तान (Pakistan) उच्चायुक्तालयाच्या चार्ज डी अफेयर्संना या संदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले. भारतातील कोणताही पाकिस्तानी राजदूत किंवा अधिकारी त्यांच्या विशेषाधिकारांचा आणि पदाचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करणार नाही याची खात्री करण्यास त्यांना सांगण्यात आले.

दानिशला देश सोडण्याचा आदेश

यापूर्वी, भारत सरकारने अहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशला पर्सोना नॉन ग्राटा म्हणून घोषित केले. त्याला देश सोडण्यास सांगितले होते. 13 मे रोजी, भारत सरकारने दानिशला त्याच्या पद आणि विशेषाधिकारांविरुद्ध भारतात हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली देश सोडण्याचे आदेश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'तो' देवदूत बनून आला! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वासराला पाठीवर बसवून वाचवला जीव; पूरग्रस्त जम्मूतील हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Mental Health And Heart Disease: नैराश्य आणि ताणतणाव वाढवतात हृदयविकाराचा धोका; मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं

मानसिक रुग्णांना मिळणार 'नवी उमेद'; IPHB मध्ये लवकरच सुरू होणार पुनर्वसन केंद्र

Gold Price Hike: शेअर बाजार पडला, पण सोन्याने घेतली उसळी, एका महिन्यात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ; आता सप्टेंबरमध्ये होणार नवा रेकॉर्ड?

Duleep Trophy 2025: 13 चौकार, 3 षटकार! आयुष बडोनीचा 'डबल धमाका'; द्विशतक ठोकून टीमला पोहोचवले उपांत्य फेरीत

SCROLL FOR NEXT