थ्री इडियट (Three Idiots) या प्रसिद्ध चित्रपटात कॉलेजचा प्रिन्सिपॉल म्हणजेच अभिनेते बमन इराणी (Baman Irani) यांना दोन्ही हाताने लिहण्याची कला अवगत असल्याचे दाखवले आहे. चित्रपटातील ते काल्पनिक पात्र आहे. पण, भारतात एका 18 वर्षांच्या मुलीला दोन्ही हाताने लिहण्याची कला अवगत आहे. एका मिनिटात ही मुलगी इंग्रजी आणि कन्नड या भाषेत 45 शब्द लिहू शकते. कर्नाटकातील मंगळूर (Karnataka, Mangaluru) येथील रहिवासी असलेल्या या मुलीचे नाव 'आदि स्वरूपा' (Aadi Swaroopa) असे आहे. आदि स्वरुपाच्या या विक्रमाची नोंद जुलै 2020 साली 'वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये (World Records) झाली आहे.
पर्यावरणवादी आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम-UNEP चे कार्यकारी संचालक एरिक सोल्हेम (Erik Solheim) हे नेहमीच भारतातील निसर्गरम्य ठिकाण परिसर यांची माहिती शेअर करत असतात. गोव्यातील दुधसागर (Goa Doodhsagar) पासून नागालॅंड (Nagaland) येथील पर्वतरांगा याबाबत ते व्हिडिओ, फोटो शेअर करुन सकारात्मक माहिती देत असतात. सोल्हेम यांनी नुकताच 'आदि स्वरूपा'चा व्हिडिओ शेअर केला असून, त्यांनी आदिचे दोन्ही हाताने लिहण्याचे कसब अद्वितीय असल्याचे म्हटले आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आदिला आयएएस अधिकारी (IAS Officer) व्हायचे आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) तिचे नाव नोंदवायचे आहे. आदिने वयाच्या अडीच वर्षापासून दोन्ही हातांनी लेखनाचा सराव सुरू केला. ती दिवसाला 30 पाने लिहायची. सततच्या सरावामुळे आदि दोन्ही हाताने अगदी सहज लिहू शकते. (Can write with both hands easily). विशेष म्हणजे इंग्रजी आणि कन्नड (English and Kannada) या दोन्ही भाषेत ती एकाच वेळी लिहू शकते.
आदि दहा वेगवेगळ्या शैलीत (Style) लिखाण करु शकते. जसं की युनिडायरेक्शनल, अपोझीट डायरेक्शनल, रिवर्स रनिंग, मिरर इमेज, डान्सिंग आणि ब्लाइंड फोल्ड अशा प्रकारात ती दोन्ही हाताने लिहू शकते (Can Write with both hands easily). याशिवाय आदि स्वरुपाला साहित्य, संगीत, चित्रकला, मिमिक्री, बीट-बॉक्स आणि रुबिक्स क्यूबमध्ये रस आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.