Indian Coast Guard Rescue Operation ANI
देश

भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 22 जणांचे प्राण; पाकिस्तानी अन् श्रीलंकन नागरिकांचाही समावेश

भारतीय तटरक्षक दलाने एमटी ग्लोबल किंग आय या व्यापारी जहाजातून सर्व 22 क्रू सदस्यांची सुटका केली आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Coast Guard Rescue Operation: भारतीय तटरक्षक दलाने एमटी ग्लोबल किंग आय या व्यापारी जहाजातून सर्व 22 क्रू सदस्यांची सुटका केली आहे. ICG जहाजे आणि ALH ध्रुव पोरबंदर येथून समुद्रात 93 नॉटिकल मैल अंतरावर बचाव कार्य करण्यासाठी सोडण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या संघात 20 भारतीयांसह 1 पाकिस्तानी आणि 1 श्रीलंकेचा नागरिक आहे. सुटका करण्यात आलेल्या लोकांना ICG जहाजे आणि हेलिकॉप्टरद्वारे पोरबंदर बंदरात आणले जात आहे, अशी माहिती ICG अधिकाऱ्याने दिली.

पोरबंदर किनार्‍याजवळ अरबी समुद्रात ही बचाव मोहीम राबविण्यात आली. गुजरात जहाजावरील अनियंत्रित पुरामुळे एमटी ग्लोबल किंगकडून संकटाचा इशारा प्राप्त झाल्यानंतर, भारतीय दतटरक्षक अधिकाऱ्यांनी हे ऑपरेशन सुरू केले.

भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अडचणीत असलेले जहाज खोर फक्कन यूएईहून भारतातून कारवारकडे जात होते. एएनआय या वृत्तसंस्थेचा हवाला देत तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जहाज 6000 टन बिटुमेन घेऊन जात आहे. तटरक्षक दलाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक विमान संकटात सापडलेल्या जहाजाभोवती फिरत असल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT