PM Modi US Visit Dainik Gomantak
देश

PM Modi US Visit: PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी भारतीयांचा उत्साह, वॉशिंग्टनसह अनेक शहरांमध्ये एकता रॅली, पाहा Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जून ते 24 जून या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.

Puja Bonkile

PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जून ते 24 जून या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. पीएम मोदींच्या या दौऱ्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी भारतीयांमध्येही प्रचंड उत्साह दिसून येत आहे. याचा व्हिडिओ एएनआयने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

  • भारतीयांनी काढली एकता रॅली

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या आगामी अमेरिका दौऱ्यासाठी स्वागत करताना भारतीय-अमेरिकनांनी वॉशिंग्टन, यूएसए येथे एकता रॅली काढली. या रॅलीमध्ये लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

एकता रॅलीत सहभागी झालेले कमलजीत सिंग सोनी एएनआयशी संवाद साधतांना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. जागतिक नेता म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

  • काय म्हणाले भारतीय-अमेरिकन

त्याचवेळी आणखी एक भारतीय रमेश म्हणाले की, आम्ही सर्वजण एकता दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. पीएम मोदी राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यासोबत सहभागी होतील, ही आपल्या सर्वांसाठी एक चांगली गोष्ट आहे. 20 हून अधिक शहरातील 900 हून अधिक लोक एकता रॅलीत सहभागी होणार आहेत.

भारतीय-अमेरिकन प्रवासी म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्यासाठी येथे आलो आहे. आम्हाला भारतीय समुदायाशी जोडणे आवडते. पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

  • 25 सांस्कृतिक कार्यक्रम

आणखी एक भारतीय अमेरिकन राज भन्साळी म्हणाले, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. येथील परदेशी भारतीयांशी जोडले जाणे ही एक चांगली भावना आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेणार आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असेल. पीएम मोदींच्या सन्मानार्थ सुमारे 25 सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

  • ही भेट खास आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी खास आणि ऐतिहासिक आहे. राज्याच्या निमंत्रणावर अमेरिकेला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत. 

त्यांचा हा आठवा अमेरिका दौरा असला तरी त्यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळातील त्यांचा हा पहिलाच राजकिय दौरा आहे. यापूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अमेरिकेच्या राज्यकिय दौऱ्यावर गेले होते. या भेटीदरम्यान अनेक संरक्षण करार केले जाऊ शकतात. प्रीडेटर ड्रोन, जेट इंजिन, चिलखती वाहने आणि हॉवित्झर यावर संरक्षण करार होऊ शकतो.

  • पंतप्रधान मोदींना 21 तोफांची सलामी देण्यात येणार

अमेरिकेच्या भूमीवर पंतप्रधान मोदींना 21 तोफांची सलामी देण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या सलामीमुळे भारत आणि अमेरिका (America) यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणि संबंधांच्या नव्या युगाची सुरुवात होईल. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि देशाची पहिली महिला जिल बायडन 22 जून रोजी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ शाही भोजनाचे आयोजन करणार आहेत. या डिनरला अमेरिकेतील सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. याशिवाय ते अमेरिकन नेते, सेलिब्रिटी आणि मोठ्या कंपन्यांचे सीईओ यांची भेट घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

Indian Racing League: थ्रिल आणि ॲक्शन! मोपा विमानतळाजवळ रंगणार 'इंडियन रेसिंग लीग'चा थरार; 6 संघांमध्ये चुरस, 'येथे' पाहता येणार Live streaming

India Economy: भारत होणार श्रीमंत अर्थव्यवस्था! दरडोई उत्पन्न पोचणार 4000 डॉलरपर्यंत; वाचा एसबीआय रिसर्चचा Report

Vande Mataram Cyclothon: 25 दिवसांत 6553 किमीची मोहीम! ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन’चा थरार; तारीख जाणून घ्या..

Goa Latest Updates: दुर्भाट, आडपई फेरीसेवेवर दाट धुक्यामुळे परिणाम

SCROLL FOR NEXT