पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने पाकड्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत घेतला. भारताने पाकिस्तानात घुसून लष्करी कारवाई केली. भारताने पाकड्यांची चांगलीच जिरवली. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उडवून लावले. जोपर्यंत दहशतवाद्यांची खोड मोडणार नाही तोपर्यंत भारत थांबणार नाही असा पवित्रा भारत सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव शांत झाला. बिथरलेल्या पाकिस्ताननेही भारतीय सीमेवर ड्रोन हल्ले केले. मात्र पाकड्यांचा प्रत्येक हल्ला भारताने परतवून लावला.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. या कारवाईदरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या संरक्षणाची ढाल बनलेल्या चिनी हवाई संरक्षण यंत्रणेला ध्वस्त करत 23 मिनिटांत दहशतवाद्यांचे तळ उडवून लावले. पीआयबीने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्ध भारताचा प्रतिसाद अचूक आणि धोरणात्मक होता. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याशिवाय भारतीय सैन्याने हल्ला करुन दहशतवादी तळांना हानी पोहोचवली.
दरम्यान, या संपूर्ण ऑपरेशनमध्ये स्वदेशी हाय-टेक सिस्टिमने समन्वयाने काम केले. ड्रोन असोत, लेयर्ड एयर डिफेंस असोत किंवा इलेक्ट्रॉनिक वॉर असोत, प्रत्येक पातळीवर एकता दाखवल्याने शत्रूचे भंबेरी उडाली. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेले स्वदेशी तंत्रज्ञान हे भारताच्या स्वावलंबीतेच्या प्रवासात एक मैलाचा दगड ठरले.
हवाई संरक्षणासाठी भारताने आकाशशिवाय Pechora, OSA-AK आणि LLAD गनचा वापर केला. आकाशने जबरदस्त प्रदर्शन केले. ही एक कमी पल्ल्याची जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करते. पाकिस्तान वापरत असलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रे चीन आणि तुर्कीमध्ये बनवले गेले होते. या कारवाईदरम्यान भारताने आपले तांत्रिक कौशल्य दाखवून पाकिस्तानची हवाई यंत्रणा नष्ट केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.