Fighter Jet Dainik Gomantak
देश

Fighter Jet: आता शत्रूची खैर नाही! भारत विकसित करतयं हायटेक लढाऊ विमान; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Fighter Jet Advanced Medium Combat Aircraft: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. डीआरडीओची शाखा असलेल्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) च्या नेतृत्वाखाली त्याचे उत्पादन आणि विकास खाजगी क्षेत्रात केले जाईल.

Manish Jadhav

पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून धडक कारवाई केली. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दोन्ही देशातील तणाव पाहता चीन पाकिस्तानला आणखी लढाऊ विमानांचा पुरवठा वाढवू शकतो. दरम्यान, भारताने स्वतःचे स्वदेशी पाचव्या पिढीतील लढाऊ विमान अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट तयार करण्याची तयारी केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला. डीआरडीओची शाखा असलेल्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) च्या नेतृत्वाखाली त्याचे उत्पादन सुरु करणार आहे. चला तर मग अमेरिका आणि चीनसारख्या (China) देशांकडे आधीच उपलब्ध असलेल्या लढाऊ विमानांच्या तुलनेत हे लढाऊ विमान किती शक्तिशाली आणि वेगळे आहे ते जाणून घेऊया...

म्हणूनच गरज भासत आहे

जगभरात युद्धाचे वेगाने बदलणारे परिमाण पाहता भारताला (India) आता पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमानांची आवश्यकता जाणवत आहे. हेच लक्षात घेऊन भारत आपली हवाई शक्ती वाढवण्यासाठी प्रगत स्टील्थ वैशिष्ट्यांसह मध्यम वजनाचे पेनिट्रेशन लढाऊ विमान विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) प्रकल्पावरही काम करत आहे. त्याच्या अंमलबजावणी मॉडेलला संरक्षण मंत्र्यांनीही मान्यता दिली. हा प्रकल्प एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांच्या सहभागातून राबवला जाईल.

हे भारताचे मध्यम लढाऊ विमान असेल

भारताचे प्रगत मध्यम लढाऊ विमान हे दोन इंजिनांनी सुसज्ज असलेले मध्यम वजनाचे बहु-भूमिका विमान असेल. डीआरडीओच्या वैमानिक विकास संस्थेने (एडीए) डिझाइन केलेले हे विमान तयार होण्यासाठी सुमारे एक दशक लागण्याची शक्यता होती. म्हणजेच 2025 पूर्वी त्याचे पहिले उड्डाण कठीण वाटत होते. म्हणूनच आता संरक्षण मंत्रालयाने यामध्ये खाजगी कंपन्यांना सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाच्या विकासाचा प्रारंभिक खर्च सुमारे 15000 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

या देशांमध्ये मध्यम लढाऊ विमाने आहेत

भारताचा मुख्य शत्रू आणि शेजारी देश चीनकडे आधीच पाचव्या पिढीतील J-20 मध्यम लढाऊ विमाने आहेत. त्यांची संख्या सुमारे 300 आहे. तसेच, दरवर्षी या संख्येत सुमारे 60 नवीन J-20s जोडली जात आहेत. याशिवाय, चीनने 26 डिसेंबर 2024 रोजी दोन सहाव्या पिढीतील लढाऊ विमाने चेंगडू J-36 आणि शेनयांग J-50 चे अनावरण केले आहे. याशिवाय, चीन अमेरिकेच्या F-35 ला उत्तर मानले जाणारे J-35 लढाऊ विमान देखील उतरवण्यास उत्सुक आहे. चीन भारताविरुद्ध पाकिस्तानला या विमानांचा पुरवठा वाढवत आहे. त्याचवेळी, अमेरिकेकडे F-35 लाइटनिंग आणि F-22 रॅप्टर लढाऊ विमाने आहेत. रशियाकडे या श्रेणीतील SU-57 स्टेल्थ लढाऊ विमाने आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Goa Live News: "POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

SCROLL FOR NEXT