India China LAC Issue  Dainik Gomantak
देश

India-China Conflict: अरुणाचल प्रदेशात 'एलएसी'जवळ 43 नवे टॉवर्स उभारणार

तवांगमध्ये चीनी सैनिकांशी संघर्षानंतर सरकारचा महत्वाचा निर्णय

Akshay Nirmale

India-China Conflict: अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सरकारने या भागात आणखी मोबाइल टॉवर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तवांग जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तवांगचे उपायुक्त के. एन. दामो यांनी सांगितले की बीएसएनएल आणि भारती एअरटेल 'कनेक्टिव्हिटी' सुधारण्यासाठी 23 नवीन मोबाइल टॉवर स्थापित करतील. सध्याचे टॉवर्स अपेक्षित सेवा देत नाहीत, ज्यामुळे केवळ संरक्षण दलांनाच नाही तर सीमेवर राहणाऱ्या नागरिकांनाही समस्या निर्माण होत आहेत. पूर्वी सीमावर्ती भागात मोबाईल नेटवर्क नव्हते, परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि बुम-ला आणि वाय-जंक्शन येथेही लोक इंटरनेट आणि मोबाइल सेवेचा आनंद घेत आहेत, परंतु आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.

दामो म्हणाले, "यामध्ये (टॉवर उभारण्याच्या कामात) संरक्षण क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. तथापि, मगो, चुना आणि निलिया (गेमिथांगजवळ) सारख्या नागरी क्षेत्रांकडेही दुर्लक्ष केले गेले नाही. जिल्हा प्रशासनाने 43 नवीन टॉवर्स बसवण्याची विनंती केली होती.

अधिका-याने सांगितले की नवीन टॉवर्स बसवण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, परंतु थंडीच्या ऋतुमुळे थोडा विलंब होऊ शकतो. जिल्ह्यातील डोंगराळ भागात यापूर्वीच बर्फवृष्टी झाली होती, तर शहरात रविवारी (18 डिसेंबर) रात्री प्रथमच बर्फवृष्टी झाली आणि तापमान उणे तीन अंश सेल्सिअसवर पोहोचले.

भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी, 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, तो भारतीय लष्कराने हाणून पाडला. पण, तवांग असो डोकलाम असो किंवा लडाख असो, चीन आपल्या कारवाया सोडत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT