Highway On LAC Dainik Gomantak
देश

Highway On LAC: चीनच्या सीमेला खेटून भारत बांधणार 2000 किलोमीटरचा फ्रंटियर हायवे

आता चीनच्या घोस्ट व्हिलेजवरही राहणार भारताची नजर

गोमन्तक डिजिटल टीम

Highway On LAC: अरूणाचल प्रदेशला लागून असलेल्या LAC (Line Of Actual Control - प्रत्यक्ष ताबा रेषा) वर सुरू असलेल्या चीनी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत आता येथे 2000 किलोमीटरचा महामार्ग बांधणार आहे. जवळपास 40 हजार कोटी रूपये खर्चून चीनच्या सीमेला खेटून या हायवेचे बांधकाम होणार आहे.

चीन आणि भारतातील अरूणाचल प्रदेश या राज्यातील सीमारेषेला मॅकमोहन लाईन म्हणून ओळखले जाते. ही सीमारेषा 2000 किलोमीटर लांबीची आहे. या मॅकमोहन रेषेवर प्रथमच असा फ्रंटियर हायवे (Frontier Highway) बांधला जाणार आहे. या हायवेमुळे संपुर्ण LAC लाच एका रेषेत जोडेल. तसेच चीनने सीमेवर वसवलेल्या अनेक घोस्ट व्हिलेजवर सुद्धा या महामार्गामुळे नजर राहणार आहे. आधुनिक सुविधा असलेल्या या गावांमध्ये चीनने माजी सैनिकांना वसवले होते. युद्धावेळी ही गावे सैन्यासाठी बराकी म्हणून वापरता येऊ शकतात.

संरक्षण विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार फ्रंटियर हायवे भुतानला लागून असलेल्या अरूणाचल प्रदेशच्या सीमेतील मगो येथून सुरू होईल. तिथून तवांग, अपर सुबानसरी, सियांग, देबांग व्हॅली आणि किबिथू येथून म्यानमार सीमेजवळ विजयनगरपर्यंत जाईल. अशाप्रकारे अरूणाचल प्रदेशला लागून असलेल्या एलएसी वर एक हायवे बांधला जाईल.

अरुणाचल प्रदेशात ट्रांस अरुणाचल महामार्ग आणि ईस्ट-वेस्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉर असे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. नवा होणारा फ्रंटियर महामार्ग आणि हे दोन महामार्ग सहा इंटर कॉरिडॉर हायवेला जोडले जातील. त्यामुळे अरूणाचल प्रदेशचे दुर्गम भागही शहराशी जोडले जाणार आहेत.

1962 च्या भारत-चीन युद्धात चीनी सैन्य अरूणाचल प्रदेशातील अनेक भागात पोहचले होते. त्या काळात रस्ते नसल्याने येथे भारतीय लष्कराच्या हालचालींवर बंधने आली होती. त्यामुळेच आता भारतीय लष्कराची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि राज्य सरकार मिळून अनेक रस्ते बांधत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Diabetes Ranking: मधुमेहात गोवा देशात अव्वल! डॉ. कामत यांचा दावा; तरुणांमध्ये वाढते प्रमाण चिंताजनक

Zuarinagar Fire: भल्या पहाटे गोदामं पेटली! झुआरीनगरात खळबळ; कोट्यवधींच्या नुकसानीची शक्यता

Cutbona Jetty: कुटबण जेटीवरील 3 डिंगी बोटी जप्‍त! मच्छीमार खात्याची कारवाई; अवैधरीत्या पार्क केल्याने दणका

Goa Live News: बायणा दरोड्यात 15 वर्षीय मुलीचे शौर्य; कुटुंबाचा जीव वाचवला!

जैवविविधता, कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार! CM सावंत; मिठागर संदर्भातील विशेष कार्य समितीची झाली बैठक

SCROLL FOR NEXT